esakal | बिनविरोध निवडणुकीची झाली तयारी अन् मध्येच घेतली दहाव्या उमेदवाराने उडी
sakal

बोलून बातमी शोधा

khedi grampanchayat election held only due to one extra candidate in chadrapur

सावलीपासून जवळच असलेले खेडी. राजकारण्यांचे हे गाव ओळखले जाते. यावर्षी तालुक्‍याचा स्मार्ट ग्राम पुरस्कारही मिळविला

बिनविरोध निवडणुकीची झाली तयारी अन् मध्येच घेतली दहाव्या उमेदवाराने उडी

sakal_logo
By
श्रीकांत पेशट्टीवार

सावली (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील खेडी हे गाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. यावेळी गावात निवडणूक न घेता बिनविरोध करण्याचा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला. नऊ सदस्य निवडले. गावात बिनविरोध निवडणुकीची चर्चा सुरू असतानाच दहाव्या उमेदवाराने उमेदवारी दाखल केला. आता एका जागेसाठी निवडणूक होत आहे. 

हेही वाचा - 'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरीत शोककळा; सरपंचांनाही...

सावलीपासून जवळच असलेले खेडी. राजकारण्यांचे हे गाव ओळखले जाते. यावर्षी तालुक्‍याचा स्मार्ट ग्राम पुरस्कारही मिळविला.  कोरोनाचा प्रादुर्भाव, शेतपिकाचे कमी उत्पन्न, झगडे भांडणे होऊ नये, गावात विकासकामाचा लाखो रुपयांचा विकास निधी मिळावा, या उद्देशाने येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजकारण न करता गावाच्या एकोप्यासाठी एकत्र येऊन निवडणूक अविरोध करण्याचा निर्णय घेतला. तीन वॉर्डात एकूण नऊ सदस्यांसाठी 9 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले होते. त्यामुळे आता ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध होणार, असे बॅनरही झळकले. बिनविरोधाचे चित्र दिसत असतानाच मात्र अखेरच्या दिवशी वॉर्ड क्रमांक तीनमध्ये अनुसूचित महिला आरक्षण जागेवर विरुद्ध बाजूचे नामांकन दाखल झाले. सर्वपक्षीय कार्यकर्ते व उमेदवारांनी सदर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, काहीच फायदा झाला नाही. आता नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एका सदस्यांसाठी निवडणूक होत आहे.

हेही वाचा - बापरे! २५ वर्षात पहिल्यांदाच निवडणूक, मग आतापर्यंत कशी व्हायची संरपंचाची निवड?

loading image