खेडकर सभागृहाची पीओपी कोसळली

नागपूर : सभागृहातील छताच्या पीओपीचा कोसळलेला भाग पाहताना उपाध्यक्ष शरद डोणेकर, मनोकर कुंभारे व शिव यादव.
नागपूर : सभागृहातील छताच्या पीओपीचा कोसळलेला भाग पाहताना उपाध्यक्ष शरद डोणेकर, मनोकर कुंभारे व शिव यादव.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहाच्या छताची पीओपी सोमवारी सकाळी अचानक कोसळली. यात महिला कर्मचारी थोडक्‍यात बचावली. पावसामुळे पीओपी कोसळल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर शंका व्यक्त होत असून, देखभाल दुरुस्तीच्या नावे होणारा खर्च जातो कुठे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
सोमवारी सकाळी महिला कर्मचारी सफाई करण्यासाठी सभागृहात गेली असता दोन ठिकाणची पीओपी कोसळली. माहिती मिळताच विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे व शिवकुमार यादव यांनी उपाध्यक्ष आणि बांधकाम सभापती शरद डोणेकर यांना माहिती दिली. तिघांनी घटनास्थळी भेट दिली. अनेक ठिकाणांहून पाणीगळतीही होत असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. शरद डोणेकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून चौकशीचे आदेश दिले.
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत गणोरकर यांनी पाण्यामुळे पीओपी खचल्याचे सांगून प्रकरणाला हलक्‍यात घेतले. दुर्घटना झाल्यावर ते प्रकरणाला गांभीर्याने घेतात, अशी चर्चा रंगली आहे. जिल्हा परिषदेच्या खेडकर सभागृहाच्या नूतनीकरणावर 75 लाख खर्च केले होते. छतावर नवीन पीओपी लावली होती. मात्र, एकाच पावसाने पीओपी खचल्याने पुढे काय होईल, असा सवाल उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com