खुशाल मडावी खून प्रकरणातील आरोपीला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

 सडक अर्जुनी : सौंदडच्या कृष्णा वॉर्ड येथील खुशाल बाजीराव मडावी (वय 25) खून प्रकरणातील आरोपी प्रमोद परसराम देशकर (वय 40, रा. सौंदड) याला डुग्गीपार पोलिसांनी आज, रविवारी अटक केली.

 सडक अर्जुनी : सौंदडच्या कृष्णा वॉर्ड येथील खुशाल बाजीराव मडावी (वय 25) खून प्रकरणातील आरोपी प्रमोद परसराम देशकर (वय 40, रा. सौंदड) याला डुग्गीपार पोलिसांनी आज, रविवारी अटक केली.
खुशाल मडावी व त्याच्या एका सहकाऱ्याने आरोपी प्रमोद देशकरचा भाऊ भरत देशकर याचा काही वर्षांपूर्वी खून केला होता. यावरून देशकर व मडावी यांच्यात जुने वैमनस्य होते. हाच राग मनात ठेवून आरोपी प्रमोदने शनिवारी (ता. 10) सायंकाळी पाचच्या सुमारास खुशाल मडावीच्या घरात शिरून त्याच्या छाती व पोटावर चाकूचे सपासप वार केले. यात खुशालचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, शांताबाई बाजीराव मडावी (वय 65) यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी प्रमोदला अटक केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khushal Madavi murder accused arrested

टॅग्स