पोटच्या मुलाला पाहण्याचीच तिची आस..

विश्वनाथ गुंजोटे 
सोमवार, 18 जून 2018

किल्लारी(लातूर) - पोटच्या मुलाने बेवारसपणे सोडून दिले असतानाही ती आजही त्या मुलाचीच आतुरतेने वाट पाहत आहे. आज ना उद्या तो येईल आणि त्याला मी डोळेभरुन पाहिल, त्यानंतर तो लगेच सोबत घेऊन जाईल, अशीच त्या ज्येष्ठ महिलेला आस आहे. पोलिसांच्या सुचनेनंतर खुशी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तिला रविवारी (ता. 17) उपचारासाठी दवाखान्यात नेले. जातानाही 'ती मला कुठे घेऊन जात आहात. माझा मुलगा मला घेऊन जाणार आहे' असे म्हणत होती.

उमरगाचे पोलिस उपनिरीक्षक माधव गुंडीले हे शनिवारी (ता. 16) किल्लारी परिसरामध्ये आले असता त्यांना एक बेवारस महिला दिसून आली. त्यांनी त्या महिलेचा फोटो काढून खुशी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांना पाठवला व महिलेसाठी काही करता येईल का बघा, अशी विनंती केली. रविवारी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्या महिलेस किल्लारी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. ती महिला खुपच अस्वस्थ दिसत होती. तिला आश्रमाची नव्हे तर उपचाराची गरज आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्या महिलेस लातुरच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवले. 

त्या महिलेस रुग्णवाहिकेत बसवताना ती सतत म्हणत होती, 'मला कुठे घेऊन जात आहात माझा मुलगा मला घेऊन जाणार आहे'. तिला दवाखान्यातही तिच्या मुलानेच दाखल केल्याचे तिला वाटत आहे. मुलाची वाट पाहत ती गेल्या कित्येक दिवसापासून बेवारस म्हणून रस्त्यावर दिवस काढत होती. खुशी फाउंडेशनच्या सहकार्याने सध्या तिला उपचारासाठी लातूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती ठिक झाल्यानंतर तिची पुढील व्यवस्था करण्यात येईल, आसे कार्यकर्त्यांनी सांगितले. 

या वेळी  फाऊंडेशनचे सुमित गावडे, श्याम बिराजदार, विशाल सगर, रुपेश जाधव, देवानंद जाधव, वैभव दत्तनगिरे, अशोक निनाळे, प्रसाद बावगे, कुणाल रामढवे, संतोष बोळशेट्टे उपस्थित होते.

Web Title: khushi foundation send one helpless woman to the hospital

टॅग्स