मामाने केले भाच्याचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नागपूर : पैशाच्या वादातून मामाने भाच्याला पळवून त्याचे अपहरण केल्याची घटना नंदनवन हद्दीतील ताजनगर, बिडगाव येथील घडली. शेख अली शेख अल्ताफ (8) असे अपहृत मुलाचे नाव आहे. तर आरोपी मामा शेख युनूस शेख अब्दुल्ला असे आरोपी मामाचे नाव आहे. नागपुरातील मुलांच्या अपहरणाचा इतिहास पाहता पोलिसात यामुळे खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मामा शेख युनूस शेख अब्दुल्ला हा त्याची बहीण खैरूनिया शेख अल्ताफ हिच्याच घरी राहतो. प्रॉपर्टीच्या पैशावरून त्यांच्यात वाद सुरू आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टी विकून येणारा पैसा त्याला पाहिजे होता. परंतु, त्याची बहीण खैरूनिया ही प्रॉपर्टी विकण्याच्या विरोधात होती. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. 26 ऑगस्ट रोजी सकाळी सहाच्या सुमारास सर्वजण झोपेत असताना युनूसने शेख अली यास पळवून नेले. मुलगा मामासोबत गेल्याने कुणीही त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. परंतु, 15 दिवस होऊनदेखील मुलगा न आल्याने त्याच्या आईला काळजी वाटू लागली. तिने युनूससोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद येत आहे. त्यामुळे खैरूनिया अधिकच काळजीत पडली आहे. यापूर्वीदेखील युनूसने शेख अली यास पळवून नेले होते. त्यावेळी समाजातील लोकांनी मध्यस्थी केल्याने युनूसने मुलाला आणले होते. परंतु, आता 15 दिवस होऊनही मुलाचा कुठेही पत्ता लागत नसल्याने मुलाचे काही बरेवाईट तर झाले नाही ना, अशी शंका शेख अलीच्या आईला येत आहे. याप्रकरणी तिच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kidnapping