दिव्यांग महिलेचे अपहरण करून अत्याचार

file photo
file photo

वानाडोंगरी (जि.नागपूर)ः आठ दिवसांपूर्वी हिंगणा तालुक्‍यातील खैरी पन्नासे या गावातील एका विवाहित दिव्यांग महिलेला दोन अज्ञात व्यक्तींनी तिच्या राहत्या घरून अपहरण केले. जबरदस्तीने दुचाकीवर बसवून शेतावर नेले. तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार हिंगणा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. परंतु, अजूनही आरोपींचा शोध लागलेला नाही. त्यामुळे अखिल भारतीय तांडा सुधार समितीने या बाबीची दखल घेऊन गावाला भेट देऊन ठाणेदार सारीन दुर्गे व दुय्यम पोलिस निरीक्षक सपना क्षीरसागर यांना निवेदन देऊन आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली.

पोलिसांत तक्रार
प्राप्त माहितीनुसार नवीन खैरीपन्नासे येथे एक बंजारा समाजाचे कुटुंब गावात किरायाने राहते. पाच महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलाचे लग्न झाले. कावेरी (बदललेले नाव ही पासष्ट टक्‍के दिव्यांग आहे. तिला बरोबर बोलता येत नाही. या एकवीस वर्षाच्या दिव्यांग महिलेला 15 नोव्हेंबरला पहाटे पाचला कामासाठी उठलेली असताना अज्ञात दोन व्यक्ती दुचाकीवर आले. त्यांनी कावेरीला जबरदस्तीने उचलून बाइकवर बसवून शेतावर नेऊन तिच्यावर दोघांनीही बलात्कार केल्याची तक्रार देण्यात आलेली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सारीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सपना क्षीरसागर यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांडा सुधार समितीकडून शिक्षेची मागणी
या घटनेतील आरोपींना त्वरित अटक करण्यासाठी अ. भा. तांडा सुधार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड, राष्ट्रीय संघटक नामा जाधव, विदर्भ शिक्षक संघाचे सरकार्यवाह पृथ्वीराज चव्हाण व धर्मेंद्र जाधव यांनी पीडित महिलेची भेट घेऊन खैरीपन्नासेला जाऊन कुटुंबाची भेट घेतली. त्यांना आधार दिला. तसेच हिंगणा ठाण्यात ठाणेदार व तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच आरोपींना त्वरित अटक करून कारवाईची मागणी केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com