हल्दीरामच्या मालकाचा अपहरणाचा डाव फसला 

अनिल कांबळे
मंगळवार, 3 जुलै 2018

'हल्दीराम'चे मालक राजेंद्र शिवकिशन अग्रवाल यांच्या अपहरणाचा डाव फसला.

नागपूर - आंतरराष्ट्रीय ब्रॅंड असलेल्या 'हल्दीराम'च्या मालकाला शहरातील कुख्यात पाच गुन्हेगारांना जीवे मारण्याची धमकी देऊन 50 लाखांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यामुळे अपहरणाचा डाव रचला. मात्र, धंतोली पोलिसांच्या सतर्कतेने हा डाव फसला. या प्रकरणात ड्रायव्हरसह पाच आरोपींना अटक धंतोली पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे व्यावसायिक वर्गात एकच खळबळ उडाली आहे. 

हल्दीराम कंपनीचे मालक राजेंद्र शिवकिशन अग्रवाल (वय 55, रा. वर्धमान नगर) हे धार्मिक वृत्तीचे असल्याने दर शनिवारी लोहा पुलाजवळील शनिमंदिरात दर्शनासाठी जातात. 27 एप्रिलला सकाळी अकरा वाजता दर्शनासाठी शनी मंदिरात गेले. तेथे दबा धरून बसलेले आरोपी सौरव भीमराव चव्हाण (वय 21, रा. रामबाग), अतुल गोपाल पाटील (24, रामबाग), रोहित राजेंद्र घुमडे (वय 29, सोमवारी क्‍वॉटर्स, सक्‍करदरा), विनोद उमेश्‍वर गेडाम (वय 23, पाचनल, रामबाग) आणि श्‍याम बहाद्‌दूर सिंग (वय 55, रा. हिरवी नगर) यांनी त्यांचा अपहरण करण्याचा डाव आखला. मंदिरासमोर मिठाई वाटत असताना पाचपैकी चार आरोपींनी राजेंद्र अग्रवाल यांना व्हॅनमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरडाओरड झाल्यामुळे आरोपी व्हॅन घेऊन पळून गेले. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन तपास केला. मात्र, आरोपीचा पत्ता लागला नव्हता. दोन महिन्यांपर्यंत आरोपींनी कोणतीही हालचाल केली नाही. आरोपींनी 28 जूनला मोबाईल आणि घरी टेलीफोनवर फोन केला. त्यांनी 50 लाखांची खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या अग्रवाल यांनी धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी ड्रायव्हर सह  5 आरोपींना अटक केली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The kidnapping plan of Haldirams owner is unsuccessful