किडनी आजाराच्या बळीच्या संख्येत वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

संग्रामपूर येथील अल्पभूधारक शेतकरी मारोती गोंडुजी तायडे (वय ६२ वर्ष) आज, ९ जुलै रोजी राहत्या घरी संग्रामपूर येथे निधीन झाले. त्यांना किडनीचा आजार होता.त्यातच त्यांचा मुत्यू झाला. त्यांचा उपचार अकोला, शेगाव आधी ठिकाणी करण्यात आला. मात्र अखेर किडनी आजारासी झुंज देत त्यांची प्राण ज्योत मावळली.

संग्रामपूर : येथील मारोती गोंडुजी तायडे या ६२ वर्षीय शेतकऱ्याचा किडनी आजाराने मुत्यू झाला. आरोग्य विभागाकरवी उपाययोजना शून्य असल्याने सुविधेचा अभाव असून, किडनी आजाराने बळीच्या संख्येत वाढ होत आहे. तालुक्याची गणना अविकसित म्हणून होते तालुका खारपाणपट्ट्यात क्षार युक्त पाण्याने आजपर्यंत हजाराच्या जवळपास किडनी आजाराने मुत्यू झाल्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या सर्वेक्षणात समोर आले तर अनेक रुग्ण किडनी आजार जडलेला आहे.

बरेचं किडनी रुग्ण मूत्युशी झुंज देत आहेत. याची आरोग्य विभाग शासन स्तरावर कुठेच नोंद नाही तर माजी मंत्री सुबोध सावजी यांनी किडनीग्रस्तांना मदत करण्या संबंधी शासनाकडे पाठपुरावा केला, लक्षवेधी आंदोलन केली; परंतु अद्यापही किडनी या आजाराने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना शासन स्तरावरून एक छदाम आर्थिक मदत झाली नाही, ही एक शोकांतिकाच नव्हे काय? वर्षातून एकदा तालुक्यात किडनी ग्रस्त रुग्णासाठी शिबिर घेऊन त्यातून संबंधित रुग्णांना किती फायदा झाला, हे तालुकावासियांना अवगत आहेच. वाऱ्यावरच सोडले जाते, असा सूर किडनीग्रस्त रुगणांच्या नातेवाईकामधून निघत आहे.

संग्रामपूर येथील अल्पभूधारक शेतकरी मारोती गोंडुजी तायडे (वय ६२ वर्ष) आज, ९ जुलै रोजी राहत्या घरी संग्रामपूर येथे निधीन झाले. त्यांना किडनीचा आजार होता.त्यातच त्यांचा मुत्यू झाला. त्यांचा उपचार अकोला, शेगाव आधी ठिकाणी करण्यात आला. मात्र अखेर किडनी आजारासी झुंज देत त्यांची प्राण ज्योत मावळली. त्यांच्या पश्यात पत्नी, दोन मुलं, दोन मुली विवाहित नातवंड असा बराच आप्त परिवार आहे. शासनाने किडनीग्रस्त रुग्णांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून किडनी आजाराने मुत्यू झालेल्या शेतकरी, शेतमजूर कुटुंबांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी तालुक्यातील किडनीग्रस्त कुटुंबांकुडून जोर धरत आहे.

Web Title: kidney disease in Sangrampur