मरावे परी अवयवरूपी उरावे, एक नीलेश गेला पण..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

मेंदूला दुखापत झाली. प्रारंभी अमरावती येथील सुयश हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. मात्र, येथे उपचाराला दाद मिळत नसल्याने कुटुंबीयांनी 17 डिसेंबरला वोक्‍हार्ट हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. येथील डॉ. अजय कुर्वे यांच्या वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार केले. उपचाराला दाद मिळत नसल्याचे डॉक्‍टरांनी नीलेश यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आणून दिले.

नागपूर : अपघातात मेंदूला जबर दुखापत झाल्याने 35 वर्षीय नीलेश वासुदेवराव वानखेडे यांचा मेंदूमृत्यू झाल्याचे निदान झाले. कुटुंबीय असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेत अयवदान केले. नीलेश यांच्या किडनीदानातून दोघांना बुधवारी जीवनदान मिळाले. एक किडनी व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये बुधवारी 74 वर्षीय व्यक्तीमध्ये तर दुसरी किडनी ऑरेंज सिटी हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटरमध्ये 38 वर्षीय व्यक्तीमध्ये यशस्वी प्रत्यारोपित करण्यात आली.

नीलेश वासुदेव वानखेडे हे मूळचे अमरावती येथील. 15 डिसेंबरला सकाळी साडेआठ वाजता त्यांचा अमरावती येथे अपघात झाला.मेंदूला दुखापत झाली. प्रारंभी अमरावती येथील सुयश हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. मात्र, येथे उपचाराला दाद मिळत नसल्याने कुटुंबीयांनी 17 डिसेंबरला वोक्‍हार्ट हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. येथील डॉ. अजय कुर्वे यांच्या वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार केले. उपचाराला दाद मिळत नसल्याचे डॉक्‍टरांनी नीलेश यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आणून दिले.

अवश्य वाचा  - आघाडी सरकार काय म्हणते; शेतक-यांना कर्जमाफी नाही म्हणते

बुधवारी मेंदूमृत असल्याचे निदान झाले. नीलेशचा मृत्यू निश्‍चित असल्यामुळे नातेवाइकांच्या डोक्‍यावर दुःखाचा डोंगर कोसळला. डॉक्‍टरांनी अवयवदानासंदर्भात समुपदेशन केले. दुःखात असतानाही अवयवदानातून इतराना जग पाहण्याची संधी देण्याचा धाडसी निर्णय घेतला. तत्काळ विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. संजय कोलते, डॉ. नरेंद्र तिरपुडे, समन्वयक वीणा वाठोडे यांना दिली. समितीने अवयवांची गरज असलेंल्याची यादी तपासली. वोक्‍हार्ट येथे 74 तर ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये 30 वर्षीय व्यक्ती किडनीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले.

Image may contain: 15 people, people standing and people sitting
किडनीदान केल्यानंतर नीलेश वानखेडे यांच्या पार्थिवाला अभिवादन करण्यात आले. 

व्होकार्टमध्ये किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, डॉ. किरण व्यवहारे, डॉ. जितेंद्र हजारे, डॉ. सुरजित हाजरा, डॉ. निशांत बावनकुळे यांनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. तर मडिकल प्रशासक डॉ. विकास चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये डॉ. शिवनारायण आचार्य, डॉ. संदीप देशमुख, डॉ. रोहित गुप्ता, डॉ. अमित देशपांडे, डॉ. स्मिता हरकरे, डॉ. अनिता पांडे यांनी 30 वर्षीय व्यक्तीला किडनी प्रत्यारोपणातून जीवनदान दिले. विभागीय अवयवादान समितीतर्फे वानखेडे कुटुंबीयांचे आभार व्यक्त करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kidney donation in Nagpur