ऍड. अनिल किलोर, ऍड. अविनाश घरोटे यांची न्यायमूर्तिपदी नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

नागपूर : शहरातील नामवंत वकील व हायकोर्ट बार असोसिएशनचे (एचसीबीए) माजी अध्यक्ष ऍड. अनिल किलोर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदी निवड निश्‍चित झाली आहे. यासंबंधी विधी व न्यायमंत्रालयातर्फे त्यांना आज (ता. 21) आदेश प्राप्त झाले.

मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तींच्या नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने वकिलांच्या नावाची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती. यामध्ये शहरातील ऍड. अविनाश घरोटे आणि ऍड. अनिल किलोर यांच्यासह नितीन सूर्यवंशी, मिलिंद जाधव या राज्यातील दोन वकिलांचासुद्धा समावेश होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदी या चारही वकिलांची निवड विधी व न्यायमंत्रालयातर्फे आज (ता. 21) निश्‍चित करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kilor, Gharte appointed as Justice