किरण ठाकूरच्या हजामतीवर बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

टेकाडी (जि. नागपूर) :  विना परवानगी मिशा कापल्याने किरण ठाकूरने सलून कामगारास दमदाटी व मालकाविरुद्ध कन्हान पोलिस ठाण्यात तक्रार केली. यामुळे नाभिक संघटनेने कन्हान परिसरात त्याच्या हजामतीवर बहिष्कार टाकला आहे. कोणीही किरणची दाढी व केस कापू नये, असे आवाहन संघटनेने पत्रकार परिषद घेऊन केले आहे.

मिशीवर वस्तरा फिरविल्यानंतर वाद घातल्याने व पाहून घेण्याची धमकी मिळाल्याने कन्हान शहर दणका संघटनेचे अध्यक्ष किरण यादव यांच्या तक्रारीवरून सलूनमालकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे नाभिक संघटना भडकल्या आहेत. किरण ठाकूर हे केवळ प्रसिद्धीसाठी मिशीवर "महाभारत' करीत असल्याचा आरोप कन्हान येथे आयोजित पत्रकार परिषदेतून करण्यात आला.
शुक्रवारी (ता. 16) किरण ठाकूर हे दाढी पूर्ण तर मिशी ट्रिम करून गेले. मात्र, काही वेळाने पुन्हा परत येऊन मिशी व्यवस्थित दिसत नाही असे म्हणत पूर्ण काढण्यास सांगितले. मिशी पूर्ण काढल्यानंतर सायंकाळी ठाकूर पुन्हा दुकानात आले व "तुने मेरी मूछ क्‍यों काटी' असे म्हणत शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिल्याचे ठाकूर यांच्या मिशीवर वस्तरा चालविणारा आकाश चौधरी याने सांगितले. याविरोधात कन्हान पोलिसांनी अदखलपात्र प्रकरण दाखल करून न्यायालयात दाद मागण्याची समज दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kiran Thakur's news