Akola News: कोतवाली पोलिस स्टेशनमधील डीबीरूममध्येच चाकू हल्ला; तक्रार करणाऱ्याचेच कृत्य

Akola Crime news
Akola Crime newsesakal

अकोला : सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमधील डीबी रूममध्ये तक्रारदार आणि गैरतक्रारदाराचे बयान पोलिस नोंदवत असताना एकाने दुसऱ्याच्या मानेवर चाकूने वार करून जखमी केले. या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

Akola Crime news
Mumbai : ... उद्घाटनासाठी तीन तास उशिरा पोहचले मंत्री केसरकर; एसटीचे अधिकारी, कर्मचारी खोळंबले

खुले नाट्यगृहासमोर अजगर अली सिंकदर अली हा चष्मा विक्रीचे काम करतो. सोबतच तो नागपूर येथील एका फायनान्स कंपनीसाठी वसुली अधिकारी म्हणूनही काम बघतो.

ता. २७ मे रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास त्याच्या दुकानासमोर एमएच ३० बीसी १८४४ क्रमांकाचा ऑटो उभा होता. त्या ऑटोचालकाने लोनचे पैसे भरले नाहीत असे अजगर अली सिकंदर अली याने ऑटोचालकाला हटकले.

लोन भरले आहे उद्या कागद आणून दाखवतो असे म्हणून ऑटोचालक निघून गेला. त्यानंतर ता. २९ मे रोजी दुपारी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये ऑटोचालक गेला आणि त्याने तक्रार केली. त्यावरून एका पोलिसाने अजगर अली सिकंदर अली याला पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. (Latest Marathi News)

Akola Crime news
CM Eknath Shinde : राज्यात 'नमो शेतकरी महासन्मान योजना'; मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी 5 मोठे निर्णय

तेथे आधीच डीबी रूममध्ये ऑटोचालक राहूल राजेंद्र कानडे उपस्थित होता. पोलिसाने अजगर अली सिकंदर अलीचे बयान नोंदवणे सुरू केले असता ऑटोचालक लघुशंकेला जातो असे म्हणून बाजूला गेला आणि दहा मिनीटानंतर परत आला.

अजगर अलीचे लक्ष नसल्याचे पाहून त्याच्याजवळील चाकूने अजगर अलीचे मानेवर वार केला. तो पुन्हा वार करणार तोच अजगर अलीने चुकवण्याचा प्रयत्न केला असता त्यात त्याचे हाताचे बोट कापल्या गेले. (Marathi Tajya Batmya)

पोलिसांनी हल्लेखोर ऑटोचालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी ऑटोचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com