क्वॉटर्स की कोंडवाडे

akola
akola

अकाेलाः घर हे प्रत्येकाचे स्वप्न, प्रत्येकाचा जिव्हाळा. घर, मग ते स्वतःचे असाे, भाड्याचे असाे वा शासनसेवाकाळात मिळालेले शासकीय निवास स्थान असाे. या घराची दुरवस्था झाली असेल तर अापण साेयीनुसार त्‍यात सुधारणा करताे. शहरात असणाऱ्या विविध विभागांच्या शासनाने दिलेल्या घरांची सुधारणा नेमकी किती अाणि कशी करावी हा यक्षप्रश्नच. अकाेला शहरात असे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था पाहिली तर हे घर की काेंडवाडा असाच प्रश्न पडताे.

शहारात पाेलिस, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, वीज वितरण कंपनी, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी विविध भागात निवसस्थानाची व्यवस्था अाहे. यापैकी काही खात्यांच्या वसाहती या माणसांनी राहव्या अशा अवस्थेत आहेत. तर काही वसाहतीत समस्यांची मालिका संपता संपत नाही. पाेलिस अाणि रूग्णालय विभागाचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी राहत असलेल्या ठिकाणांची अवस्था पाहिली तर ही घरं अाहेत की काेंडवाडे असाच प्रश्न पडताे.

पाेलिस वसात अंधारकाेठडीच
अनीकट येथे पाेलिस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत प्रवेश केला तर घराचे प्रवेशद्वार अाहे की घरामागे सर्व्हीस गल्लीत उघडणारे घराचे मागचे दार अाहे, हे समजणेच कठीण . घरासमाेर असणारी नाली, नालीत लाेळणारी डुकरांची पिल्ल, घराचे दार उघडे दिसले की घरात शिरणारी डुकरं अशी बिकट अवस्था येथे पाहायला मिळते. नावापुरते स्वयंपाक घर अाणि त्याला लागून एक खाेली. त्या खाेलीत लाईट लागलेला नसेल तर दिवसाही अंधार अशी अवस्था. स्वयंपाकच्या अाेट्याची उंची चक्क छातीपर्यंत येत असल्याने शेगडीवर शिजणारी भाजी शिजली की नाही हे पाहण्यासाठी स्टुल घ्यावा लागताे, अशी व्यथा गृहिणींनी मांडली. शाैचालयाला कसेबसे दार असले तरी अनेकांच्या घरातील स्नानगृहांचे दारच बेपत्ता अाहे. घराच्या छताची काही दिवसांपूर्वी डागडूजी केली असली तरी अनेक घरांवर असणाऱ्या बल्ल्या सडल्या असून, यामुळे घरात अळ्या, किड्यांनी थैमान घातले अाहे. ज्यांच्या घरात लाहान मुलं अाहेत त्यांना तर अापल्याच घरात प्रचंड दक्षता घ्यावी लागते. तक्रार करायची कुणाकडे? दुरूस्तीवर खर्च कराचा तरी किती? या विचारात अाला दिवस काढणे असेच पाेलिस वसाहतीत रहाणऱ्यांची काहाणी अाहे.

अाराेग्य कर्मचाऱ्यांच्या निवासाचे अाराेग्य धाेकक्यात
साहेबलाेकं, डाॅक्टर यांना छानशी घरं असली तरी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मात्र कसेही राहावे असाच जणू नियम असल्याची भीषणता शासकीय माहाविद्यालय व रूग्णालय कर्मचाऱ्यांची निवासस्थान पाहून जाणवते. रूग्णालय परिसरात सहा इमारती अाहेत. यापैकी दाेन इमारती या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या अाहेत. एका इमारतीत १६ कुटंबाचे वास्तव्य असून, या इमारतींवर चक्क झाडं झुडूपं वाढली अाहेत. यापेक्षाही गंभीर परिस्थिती ही गाैरक्षण मार्गावर असणाऱ्या वसाहतीत पाहायला मिळते. याठीकाणी अधिकारी अाणि डाॅक्टरांच्या निवासासाठी चकाचक निवासी संकुलाची निर्मिती केली असली तरी येथे सहा घरांची अवस्था मात्र विदारक अाहे. घरांची छपाई खरडून निघाली अाहे. दारं- खिडक्या या नावापुरत्याच अाहे. गंभीर बाब म्हणजे, या सहाही घरांचे शाैचलय एकाच ठिकाणी एका काेपऱ्यात असून, झाडाझुडपांनी वेढले अाहे. शाैचालयांचे पाईप फुटले असून, येथील घरांचे अाणि रहिवशांचे अाराेग्यच धाेक्यात अाहे.

गाैरक्षण मार्गावरच वीज महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांचीही वासाहत अाहे. या वसाहतीची अवस्था बऱ्यापैकी चांगली अाहे. येथील एक इमारत १९७८ साली बनली असून, तिची अवस्था जीर्ण झाली दिसते.

जलसंपदा विभागातही बाेंब
घारत लागलेल्या अाकर्षक टाईल्स छानसं वातारण असलं तरी जलसंपदा विभाग कर्मचारी वसाहतीतही अनेक समस्यांची बाेंब अाहेच. अनेक घराला अाेल अाली असून, अनेक घरांच्या भिंतींचे पाेपडे निघत अाहे. काहींचे छताचे पाेपडे खाली पडताहेत. घरात असणाऱ्या लहानमुलांसाठी हे धाेकादायक अाहे. काही कर्मचाराऱ्यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रर केली असता, पटत नसेल तर बाहेर भाड्याने राहायला जा असे उत्तर मिळाल्याच्या वेदना काहींनी बाेलून दाखविल्या.

सर्व वसाहतीत अस्वच्छता, मच्छरांचा त्रास
पाेलिस वसाहत असाे वा अाराेग्य कर्मचरी, वीज कर्मचारी, महसूल, जलसंपदा सर्वच वसाहतींमध्ये अस्वच्छता अाणि मच्छरांचा त्रास ही काॅमन अाणि गंभीर समस्या अाहे. अगदी डाेक्याच्या वरपर्यंत झुडूपं वाढली असून, मच्छरांच्या त्रासाने सारेच हैराण अाहेत. नाल्यांच्या सफाईचा प्रश्नही गंभीर अाहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com