"पेसा'तील पात्र कृषिसेवकांना नियुक्तीची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

चंद्रपूर : राज्यात कृषिसेवकपद भरतीदरम्यान सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या भरती स्थगितीला उच्च न्यायालयानेही कायम ठेवले. त्यामुळे पेसा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या तालुक्‍यातील उमेदवारांना याचा फटका बसला. पेसाअंतर्गत पदभरतीची प्रक्रिया वेगळी असल्याने येथील उमेदवारांना स्थगितीतून वगळण्याच्या मागणीचे निवेदन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना देण्यात आले आहे.

राज्य सरकारने मार्चमध्ये राज्यात कृषिसेवक पदभरती घेतली. गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवडही केली. मात्र, ऑनलाइन परीक्षेत सामूहिक कॉपीची तक्रार होताच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने भरतीला तात्पुरती स्थगिती दिली. त्यानंतर उच्च न्यायालयानेदेखील स्थगिती कायम ठेवली. त्यामुळे राज्यातील पात्र उमेदवार अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना व जिवती हे तालुके पेसाअंतर्गत येतात. त्यामुळे या तालुक्‍यातील पदभरतीची प्रक्रिया पेसा कायद्यांतर्गत घेतली जाते. स्नेहा परचाके, भाग्यश्री आत्राम, सिद्धेश्‍वर गेडाम, अरविंद मेश्राम, मंगेश मेश्राम, सुरेंद्र किन्नाके, प्रशांत घोडाम यांच्यासह अन्य निवड झालेल्या कृषिसेवकांना स्थगिती आदेशाच्या अंमलबजावणीतून वगळण्याकरिता सरकारने न्यायालयात विनंती अर्ज सादर करावा, असे दीपक चटप यांनी निवेदनातून म्हटले आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी याप्रकरणी माहिती घेऊन उचित कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.

Web Title: krushi sevek waiting for posting