क्षिप्रा मोतीकर विदर्भात प्रथम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

नागपूर - देशातील ‘कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्‍झामिनेशन’तर्फे (आयसीएसई) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकालाची घोषणा सोमवारी (ता.१४) दुपारी तीन वाजता करण्यात आली. आयसीएसई दहावीच्या परीक्षेत काटोल मार्गावरील चंदादेवी सराफ स्कूलच्या क्षिप्रा प्रभाकर मोतीकर हिने ९८ टक्‍क्‍यांसह विदर्भात प्रथम स्थान पटकाविले. त्या पाठोपाठ अमिषा  खोब्रागडेने ९६.६ टक्‍क्‍यांसह दुसरे तर राजीव यादव याने ९५.६ टक्‍क्‍यांसह तिसरे स्थान पटकाविले. 

आयसीएसईद्वारे २६ फेब्रुवारी ते १२ एप्रिलपर्यंत दहावी (आयसीएसई) तर आणि बारावीच्या (आयएससी) सात फेब्रुवारी ते चार एप्रिलपर्यंत परीक्षेचे आयोजन करण्यात आले  होते. यामध्ये चंदादेवी सराफ स्कूल, सेवंथ डे ॲडव्हान्सटीस्ट, एमएसबी स्कूल, मारी पाउस्पीन स्कूलसह सात शाळांमधून पाचशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. भारतातील दोन हजार १०६ शाळांमधून अडीच लाखावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात दहावीमध्ये एक लाख ८३ हजार ३८७ तर आयएससीमध्ये ८० हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यानुसार सोमवारी (ता.१४) निकालाची घोषणा करण्यात आली. आयसीएसईमध्ये ९८.५ टक्के तर आयएससीमध्ये ९६.२ टक्के  विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आयसीएसईमध्ये ९८.९५ टक्के मुली तर ९८.१ टक्के मुले उत्तीर्ण  झालेत. आयएससीमध्येही मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. यात मुलींची टक्केवारी ९७.६३ तर मुलांची टक्केवारी ९४.९६ टक्के आहे. नागपुरातून जवळपास सर्वच शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. त्यापैकी पहिले तिन्ही विद्यार्थी चंदादेवी सराफ स्कूलचे आहेत. 

दृष्टिक्षेपात आकडेवारी 
नोंदणी केलेले विद्यार्थी 
आयसीएसई (दहावी)-  एक लाख ८३ हजार ३८७ 
आयएससी (बारावी)- ८० हजार
बसलेले विद्यार्थी (दहावी) - १ लाख ३६९, (बारावी) - ४३ हजार ५२
उर्त्तीण विद्यार्थी (दहावी) - ९८ हजार ५१७ - (बारावी) ४० हजार ८८३
मुलींची संख्या (दहावी)- ८३ हजार १८ - उत्तीर्ण - ८२ हजार १४६
बारावी - ३७ हजार ८२८ - उत्तीर्ण - ३६ हजार ९३३

आयआयटीला जायचंय 
सुरुवातीपासून अभ्यास करून आयआयटीत जाण्याचं स्वप्न उराशी बाळगले आहे. त्यासाठीच मन लावून अभ्यास केला. निकालात मिळालेले यश अपेक्षित होते. आता बारावीनंतर आयआयटी पवईमध्ये कॉम्प्युटर सायन्स विषयासह प्रवेश मिळवायचा आहे.
-शिप्रा मोतीकर 

Web Title: Kshipra Motiar first in Vidarbha