"दे चितपट', "दे धोबीपछाड'  मांढळच्या दंगलीत चांगलीच रंगत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

मांढळ (जि. नागपूर): मांढळच्या प्रसिद्ध दंगलीत दील्ली, कर्नाटक, हरियाना, पंजाब, गडचिरोली, औरंगाबाद, नागपूर, भंडारा, गोंदियायासह देशभरातील मल्लानी अखाड्याच्या मातीत नशीब अजमावले. दिल्लीचा अजय पहेलवान, माढळच्या मधुकर सातपैसे, नागपूरचा शैलेश, आदीत्य, ज्ञानेश, मोहाडीचा यशवंत थोटे, चिचघाटचा राहुल या सारख्या मातब्बर पहेलवानांनी प्रतिस्पर्धींना चांगलेच धोबीपछाड दिले. कुश्‍तीचा सामना रंगताना "दे चितपट', "दे धोबीपछाड' असे आवाज प्रेक्षकांतून गुंजत होते. 

मांढळ (जि. नागपूर): मांढळच्या प्रसिद्ध दंगलीत दील्ली, कर्नाटक, हरियाना, पंजाब, गडचिरोली, औरंगाबाद, नागपूर, भंडारा, गोंदियायासह देशभरातील मल्लानी अखाड्याच्या मातीत नशीब अजमावले. दिल्लीचा अजय पहेलवान, माढळच्या मधुकर सातपैसे, नागपूरचा शैलेश, आदीत्य, ज्ञानेश, मोहाडीचा यशवंत थोटे, चिचघाटचा राहुल या सारख्या मातब्बर पहेलवानांनी प्रतिस्पर्धींना चांगलेच धोबीपछाड दिले. कुश्‍तीचा सामना रंगताना "दे चितपट', "दे धोबीपछाड' असे आवाज प्रेक्षकांतून गुंजत होते. 
कुही तालुक्‍याची व्यापारनगरी अशी ओळख असलेल्या मांढळच्या भोला हुडकी येथील स्टेडीयममध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही वीस हजारपेक्षा जास्त कुस्तीशौकिकिंच्या साक्षीने देशभरातील पहेलवानानी कुश्‍तीचे कसब दाखवत दंगलीत चांगलीच रंगत आणली. उद्‌घाटनाला कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, उमरेडचे आमदार राजू पारवे, खासदार कृपाल तुमाने, आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार सुधीर पारवे, मांढळचे सरपंच शाहु कुलसंगे, मांढळ बाजार समितीचे सभापती माजी जि.प. सदस्य मनोज तितरमारे, उपासराव भुते, आखाडा प्रमुख प्रभाकर राऊत, कॉंग्रेसचे नेते संजय मेश्राम, सनदी अधीकारी राजू राऊत, मोहन मते, उपसरपंच सुखदेव जिभकाटे प्रामुख्याने उपस्थित होते. 
दंगलीच्या तयारीसाठी तालुका प्रशासनासह ग्रामपंचायत प्रशासनाने सहकार्य केले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. कुहीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निकम, डॉ. रचना नागदेवे, डॉ. गेडाम, डॉ. नगराळे, पर्यवेक्षक ललींद्र थुल यांनी आरोग्यतपासनी सुरू ठेवली होती. तर मांढळ येथील राजू तिवसकर, नरेंद्र बारई, आशीष आवळे, प्रदीप कुलरकर, संजय निरगुळकर, धनपाल लोहारे, पूनमचंद वासनिक, मंगेश सलामे, स्वप्नील राऊत, संदीप ईटकेलवार, पुंडलीक राऊत, लीलाधर धनविजय, मधुकर फोफसे, मनीराम डहारे, कडुकार पहेलवान यांच्यासह तालुक्‍यातील विविध पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी मदत केली व उपस्थिती लावली. 
पहेलवान लागला मकरंदच्या मागे 
दंगलीसाठी आलेल्या कर्नाटकचा प्रकाश पहेलवान हा त्याच्या अंगकाठी वजन व कुस्ती कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्याने औरंगाबादच्या सागर पहेलवाना आसमान दाखवीले व बक्षिसासाठी मकरंद अनासपुरेंच्या मागेच लागला. तो मकरदला सोडत नसल्याचे पाहून नंतर समितीने त्याची समजूत काढली. यावेळी झालेली मुलिंच्या कुश्‍तीची दंगलही चांगलीच रंगली. उपस्थित मकरंद अनासपुरेसह मुलींच्या कुश्‍तीला सर्वांनीच दाद दिली. 
कु श्‍तीच्या विकासासाठी मिळाले आश्‍वासन 
यावेळी उपस्थित आजी-माजी आमदार व खासदारांनी कुश्‍तीच्या विकासासाठी निधी देण्याचे कबुल केले. खा. कृपाल तुमाने, आ. टेकचंद सावरकर यांनी निधी देण्याचे कबुल केले. तर माजी आ. सुधीर पारवे यांनी सेवा केली आहे पुढेही करीत राहील, असा शब्द दिला. उपासराव भुते यांनी मांढळच्या विकासासाठी झटेल असे सांगितले. राजेंद्र मुळक व मनोज तितरमारे यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 
नाम फाऊंडेशन म्हणजे माणसांनी माणसाच्या भल्यासाठी चालविलेली मोहिम आहे, त्याचा मी सदस्य आहे. कुही तालुक्‍यात मजबूत व प्रामाणिक हात मिळाले तर "नाम'च्या माध्यमातून शेतकऱ्याना निश्‍चितच मदत व मार्गदर्शन करणार असल्याचे आश्‍वासन प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिले. यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे आमदारांना दोन रुपयांत चांगल्या दर्जाच जेवन मिळते, त्याचप्रमाणे सामान्य माणसाला दोन रुपयातच जेवन मिळाल पाहीजे यासाठी प्रत्येक आमदाराने झटले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली. 

उमरेडच्या सामान्य माणसाला मोठ करण्यासाठी मला लोकांनी आमदार म्हणून निवडून दिले आहे. "आपला माणूस' म्हणूनच पाचही वर्ष काम करेल. अखाड्याच्या विकासासाठी कटिबध्द आहे. 
- राजू पारवे, आमदार 

वडील स्व. डोमा वस्ताद व सहकाऱ्यांनी सुरू केलेली परंपरा तन-मन-धनाने कायम राखण्याचा प्रयत्न करीत आहोत. यासाठी मंत्री, लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले. त्यामुळेच याला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. 
- प्रभाकर राऊत, आखाडा समीती प्रमुख 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kuś‍tīcā sāmanā raṅgatānā"dē citapaṭa', "dē dhōbīpachāḍa' asē āvāja ५९/५००० "De Chitpat", "De Dhobiphad" sound while wrestling match