फिफ्टी-फिफ्टीच्या फॉरम्युल्यावर सुरू होता कुंटणखाना

images01.jpg
images01.jpg

अकोला ः बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम येवता येथे एका राहत्या घरात दोन महिला ग्राहकांकडून पैसे घेऊन घराच्या एका खोलीत चालवित असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करून दोन महिलांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी (ता.15) करण्यात आली. या दोन महिलाविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बार्शीटाकळी पोलिस स्टेशन अंतर्गत ग्राम येवता येथे राजकारणात सक्रीय असलेली एक महिला तिच्या राहत्या घरात तिच्या साथीदार महिलेला सोबत घेऊन घराच्या एका खोलीमध्ये कुंटणखाना चालवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक छाया वाघ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंटरसह छापेमारी केली असता घराच्या एका खोलीत दोन महिला वेश्या व्यवसाय करताना आढळून आल्या. या दोन महिला विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3, 4, 5, 5 (1)(क) 9 नुसार बार्शीटाकळी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गांवकर, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, मूर्तिजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक छाया वाघ, रवी पालीवाल, गणेश धुंमटवाड, गोपाल पाटील, भाग्यश्री मेश्ररे, तृष्णा धुमन यांनी केली.

दोन्ही महिला आरोपींवर याआधीही झाली होती कारवाई
येवता येथील राजकारणात सक्रीय असलेली महिलेला वेश्या व्यवसायाची चटक असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीसुद्धा याच महिलेवर कारवाई करून तीन पीडितेंची सुटका केली होती. तर शुक्रवारी पुन्हा तिच्यावर कारवाई करण्यात आली. तर या महिलेला सहकार्य करणाऱ्या महिला आरोपीला मागील वर्षी येथील अंबिकानगरातून याच प्रकरणातून अटक करण्यात आली होती. या दोन्ही महिला वेश्या व्यवसायात मुरलेल्या असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली.

गरजू महिला बनवितात ‘शिकार’
ग्राम येवता येथील राजकारणात सक्रीय असलेली महिला ही वेश्या व्यवसाय चालविण्यासाठी गरजू महिला-तरुणींच्या शोधात असते. गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून हे घृणास्पद काम करून घेत आहे. तिचा हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू असून, आर्थिक लाभापोटी गरजू महिलाही त्या महिलेच्या शिकार बनत आहेत. तर 50-50च्या फॉरम्युल्यावर हा व्यवसाय करून घेतल्या जात आहे.

एकाच आठवड्यात दुसरी कारवाई
रामदासपेठ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रसोई फॅमिली रेस्टारंट तसेच हॉटेल ब्ल्यू डायमंडचा भाडेकरू प्रशांत जावरकर तसेच चालक सनी नवले हे ग्राहकांकडून पैसे घेऊन हॉटेल ब्ल्यू डायमंडच्या खोलीमध्ये वेश्या व्यवसाय करून घेत होते. या माहितीवरून पोलिस उपनिरीक्षक छाया वाघ यांनी छापा टाकून सनी नवले आणि प्रशांत जावरकर या दोघांना ताब्यात घेऊन देहविक्री प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईला आठवडा उलटत नाही तोच येवता येथे कारवाई करून दोन महिलांना अटक करण्यात आली.

वेश्या व्यवसायाबाबत माहिती कळवा
वेश्या व्यवसायाबाबत कोणतीही माहिती आढळून आल्यास याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती देण्यात यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुपीत ठेवण्यात येणार आहे.
-छाया वाघ, पोलिस उपनिरीक्षक,एलसीबी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com