साकोलीत महिला मजुरांचे उपोषण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

साकोली (जि. भंडारा) : वनविभागात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या महिला मजुरांना डावलून नवीन हंगामी महिला कामगारांना कामावर घेतले. यामुळे दुखावलेल्या नऊ महिला मजुरांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर सोमवार (ता. 3)पासून उपोषण सुरू केले. पूर्ववत कामावर घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

उपोषणकर्त्या महिला कामगारांनी सांगितले की, त्या 10 ते 15 वर्षांपासून रोपवनाच्या कामावर कार्यरत आहेत. परंतु, वनविभागाने त्यांना नियमित काम दिले नाही. नियमित काम उपलब्ध व्हावे याकरिता त्यांनी 18 फेब्रुवारी 2013 ला उपोषण केले होते. तेव्हा अधिकाऱ्यांनी नियमित काम देण्याचे आश्‍वासन दिले. काही दिवस त्यांना सतत काम मिळाले. परंतु, नोव्हेंबर 2015 पासून त्यांना काम मिळाले नाही. उलट इतर हंगामी महिलांना विभागाचे काम देण्यात आले. यात अन्याय झाल्यामुळे विभागाच्या धोरणाविरोधात महिलांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले.
या उपोषणात मंगला कापगते, शीला उके, मनोरमा भैसारे, पद्मा कोचे, विमल देशमुख, अनिता वलथरे, सुंदरा लांजेवार, मैना वाहाने व छाया वैद्य यांचा समावेश आहे.

Web Title: labour agitation at sakoli