कामगार भवनाला जागा मिळणारच !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

नागपूर : जागा कोणाचीही असो, मात्र कामगार भवनासाठी जागा मिळणार, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगार भवनाला विरोध करणाऱ्यांना ठणकावत जागा देण्याची जाहीर घोषणा केली. कामगार प्रशिक्षण केंद्रात नुकताच कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. आठ वर्षांपासून गायत्रीनगर येथील कामगार भवनाच्या जागेचा तिढा होता. यासंदर्भात "सकाळ'ने पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांनी वृत्ताची दखल घेत जागा देण्याची घोषणा केली. त्यामुळे विदर्भातील कामगारांना आता हक्‍काचे कामगार भवन मिळणार यात शंका नाही.

नागपुरातील गायत्रीनगर येथे कामगार प्रशिक्षण केंद्र आहे. या परिसरामधील 30 हजार चौरस फूट जागा कामगार भवनासाठी देण्यात यावी, याकरिता 2011 मध्ये प्रस्ताव करण्यात आला. तो प्रस्ताव मुंबईतील कामगार मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. याकरिता 2017 मध्ये शासनाने 18 कोटींचा निधी मंजूर केला. जागा मिळाल्यांनंतर लगेच कामगार भवनाच्या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आठ वर्षांनंतरही प्रस्तावावर अधिकाऱ्यांनी साधी चर्चा घडवून आणली नाही. काही अधिकाऱ्यांनी तर कामगार भवनाची गरज नसल्याचे सांगून विदर्भातील अधिकाऱ्यांना आल्यापावली परत पाठविले होते. या प्रकरणामध्ये असंघटित कामगाराचे नेते विलास भोंगाडे यांनी विदर्भस्तरावर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. यामुळे विदर्भातील कामगार आयुक्‍त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर कामगारमंत्री संजय कुटे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चाही केली होती. त्यानंतर यावर वृत्तप्रकाशित करून "सकाळ'ने प्रकरण लावून धरले. यामुळे कामगार मंत्रालय खडबडून जागे झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आले असता त्यांना यासंदर्भात असंघटित कामगार आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी कामगार प्रशिक्षण केंद्रात आयोजित कार्यक्रमात कामगार भवनासाठी जागा देण्याची जाहीर घोषणा केली.

मुख्यमंत्र्याचे अभिनंदन : विलास भोंगाडे
मुख्यमंत्र्यांनी कामगार भवनाच्या जागेची वेळीच दखल घेतल्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो. लवकरच बांधकामाला सुरुवात होईल, आणि कामगारांना हक्‍काचे भवन मिळेल, यात तिळमात्र शंका नाही, अशी प्रतिक्रिया असंघटित कामगारांचे नेते विलास भोंगाडे यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: labour bhavan news