वाघाच्या हल्ल्यात मजुराचा बळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

भद्रावती (जि. चंद्रपूर) - शेतशिवारात गेलेल्या एका मजुरावर वाघाने हल्ला केला. यात त्या मजुराचा मृत्यू झाला. गुलाबराव संबा धांडे (वय 47) असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी सीतारामपेठ भागात घडली.

पूजेसाठी बेलाची पाने आणण्यासाठी गुलाबराव शेतात गेले होते. या वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गुलाबराव मृत्युमुखी पडले.

वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. वनविभागाने 25 हजारांची आकस्मिक मदत दिली. या वर्षातील ही तिसरी घटना आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. पाळीव जनावरांनाही वाघाने लक्ष्य केले आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

Web Title: labour death by tiger attack