प्रॉपर्टी डीलरकडून नोकराचा खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

नागपूर - पत्नीशी अनैतिक संबंध असलेल्या नोकराचा प्रॉपर्टी डीलरने पाच लाखांची सुपारी देऊन खून केला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली तर मुख्य आरोपी पसार आहे. अक्षय रेवाराम तितरमारे (वय २२, नरसाळा रोड, हुडकेश्‍वर) असे मृताचे नाव आहे. 

नागपूर - पत्नीशी अनैतिक संबंध असलेल्या नोकराचा प्रॉपर्टी डीलरने पाच लाखांची सुपारी देऊन खून केला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली तर मुख्य आरोपी पसार आहे. अक्षय रेवाराम तितरमारे (वय २२, नरसाळा रोड, हुडकेश्‍वर) असे मृताचे नाव आहे. 

कुही तालुक्‍यातील रुयाळ गावातील रहिवासी अक्षय प्रॉपर्टी डीलर विजय मोहोडकडे दोन वर्षांपासून कार्यालयात नोकर म्हणून काम करायचा. त्याच्यावर ऑफिससह घरकामाचीही जबाबदारी होती. यादरम्यान अक्षयचे मालक विजयच्या पत्नीशी सूत जुळले. २१ सप्टेंबरला अक्षयला मालकाने काही कामासाठी घरी पाठवले. त्याला लगेच परत येण्यास सांगितले होते; मात्र वेळ झाल्याने विजय स्वतःच घरी गेला. तेथे अक्षय पत्नीसोबत बेडरूममध्ये नको त्या अवस्थेत सापडला. विजयने त्याला मारहाण करून घरातून हाकलून दिले. 

एवढ्यावर न थांबता २३ सप्टेंबरला विजयने सतीश श्रावण कैकाडे (वय ३२, नरसाळा) याला अक्षयच्या खुनाची सुपारी दिली. विजयचा साळा अमोल अरुण तुप्पट (वय २४, पारडी) आणि सुजित मुन्ना चौहान (वय १९, रा. नरसाळा) यांनाही कटात सहभागी केले. २५ सप्टेंबरला तिघांनी अक्षयला दिलेला मोबाईल परत मागण्यासाठी घरी येणार असल्याचे सांगितले. ते रात्री बारा वाजताच्या सुमारास अक्षयच्या खोलीवर धडकले. 
हुडकेश्‍वर ठाण्यातील नोंदीवरून प्रकरणाचा छडा लागला. ही कामगिरी संजय पुरंदरे, सायबरचे सहनिरीक्षक अरविंद सराफ, उल्हास भुसारी, पुरुषोत्तम अहेरकर, अजबसिंग जारवाल, हवालदार लक्ष्मीप्रसाद दुबे, जयप्रकाश शर्मा, सूरज परमार, मदन असतकर, संतोष पंढरे यांनी केली.

नदीपात्रात सापडला मृतदेह
जुगार खेळायला चल, असे सांगून आरोपींनी अक्षयला गाडीत बसविले. गाडी कन्हान नदीच्या पुलावर थांबवली. अक्षयने चूक झाल्याचे मान्य करून नेहमीसाठी नागपूर सोडून जाण्याचे आश्‍वासन दिले. तरीही त्यांनी अक्षयवर चाकूने वार केले. २९ सप्टेंबरला कन्हान नदीच्या सिंगारदीप पात्राजवळ अक्षयचा मृतदेह आढळला. 

बेपत्ता असल्याची होती तक्रार
हुडकेश्‍वरमध्ये अक्षयची आई इंदिराबाई तितरमारे यांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. या प्रकरणाचा तपास एलसीबीचे प्रमुख संजय पुरंदरे यांच्याकडे होता. मृतदेहाच्या वर्णनावरून मृतदेह वाहत आलेल्या दिशेकडील गावांमध्ये चौकशी केली.

Web Title: labour murder by property dealer

टॅग्स