"महावेध'मुळे टळणार कोट्यवधींचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

नागपूर - राज्यात पूर्वी हवामानातील बदलांची माहिती देणारी सक्षम यंत्रणा नसल्याने दरवर्षी दोन हजार कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान होत होते. मात्र, महावेध प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्रामुळे हे नुकसान टाळणे शक्‍य होणार आहे. शेतकऱ्यांना याची मोठी मदत होणार असल्याच्या विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. 30) येथे व्यक्‍त केला. 

कृषी विभागातर्फे महावेध प्रकल्पांतर्गत डोंगरगाव येथे स्वयंचलित हवामान माहिती केंद्राचे हस्तांतर व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार, कृषी आयुक्‍त विकास देशमुख, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, की महसूल मंडळ स्तरावर हवामान माहिती केंद्र उभारण्यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. त्याच प्रकल्पाची सुरवात नागपुरातून होत असल्याचा आनंद आहे. असे केंद्र उभारून शेतकऱ्यांना हवामानाची माहिती उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. पुढील तीन महिन्यांत स्कायमेट कंपनीच्या सहकार्याने राज्यात दोन हजार 65 केंद्रे उभारण्यात येतील. पन्नास लाख शेतकऱ्यांना एसएमएसच्या माध्यमातून हवामानातील बदलांची अचूक माहिती मिळण्यास मदत होईल. पुढील टप्प्यात राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेटच्या साह्याने जोडून ही माहिती डिजिटल किऑस्क बोर्डवर उपलब्ध करून दिली जाईल. शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज नुकसान टाळण्यास मदत होईल. 

स्वयंचलित हवामान केंद्रामुळे शेतकऱ्यांना दुसऱ्या यंत्रणेवर विसंबून राहावे लागणार नाही. गावात माहिती उपलब्ध होणार असल्याने नुकसान टाळण्यास मदत होईल. 
- पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री 

Web Title: Lack of billions of dollars will be lost due to Mahadeep