लेडी ज्वेलरी थिप : सराफा व्यावसायिकाला 70 हजाराने गंडविले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

चाळीस ते पंचेचाळीस वर्षे वयोगटातील एक महिला दुकानात आली. सोन्याची अंगठी व डोरले दाखविण्यास सांगितले. 43 हजार रुपये किमतीचे डोरले व 27 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा एकूण 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हातचलाखी करून चोरून नेला.

यवतमाळ : सोने खरेदी करण्याच्या उद्देशाने दुकानात आलेल्या महिलेने सराफा व्यावसायिकाला गंडविले. हातचलाखी करून तिने 70 हजार रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना शनिवारी घडली. 
प्रफुल्ल रमेश लष्करी (रा. गांधी चौक) यांचे श्‍याम टॉकीज चौकातील सराफा ओळीत ज्वेलरीचे दुकान आहे. ते कामानिमित्त बाहेर गेल्याने दुकानात त्यांची बहीण दीपा लष्करी व नोकर सुरेश खरवळे हे दोघेच होते. चाळीस ते पंचेचाळीस वर्षे वयोगटातील एक महिला दुकानात आली. सोन्याची अंगठी व डोरले दाखविण्यास सांगितले. 43 हजार रुपये किमतीचे डोरले व 27 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा एकूण 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हातचलाखी करून चोरून नेला. ही बाब लक्षात येताच खळबळ उडाली. प्रफुल्ल लष्करी यांनी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अनोळखी महिलेविरुद्घ गुन्हा नोंदविला आहे. 

दिवाळीत चोरट्यांची चांदी 
दिवाळीत सुट्या असल्याने नागरिक बाहेरगावी जात आहेत. बंद घरांना टार्गेट करून चोरटे घर फोडून हजारोंचा मुद्देमाल लांबवित आहेत. बसने प्रवास करणाऱ्या महिलांकडील लाखोंचे दागिने उडविल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, दुचाकीस्वारांकडून रोख रक्कम व दागिने उडविले जात आहेत. आता सराफा दुकानात भरदिवसा सोन्याचे दागिने उडविल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्यांचा वावर सर्वत्र असल्याचे विविध घटनांवरून दिसून येते. पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lady Jewelry thief: Jewelry trader lost 70 thousand rupees