'पणन'वर "लक्ष्मी'कृपा

file photo
file photo

यवतमाळ : महाराष्ट्र कापूस उत्पादक महासंघांने शुक्रवारी (ता.29) शासकीय कापूस खरेदीला सुरूवात केली आहे. आर्णी तसेच पुसद केंद्र सुरू करण्यात आले. या ठिकाणी पहिल्याच दिवशी जवळपास तीन हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्याने यंदा "पणन'वर "लक्ष्मी'कृपा झाल्याचे दिसत आहे.

कापूस हे हुकमी पीक

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कापूस हे हुकमी पीक आहे. कापसावरच शेतकऱ्यांचे वर्षभरातील आर्थिक नियोजन अवलंबून असते. यंदा अवकाळी पावसाने कापूस पीक संकटात सापडले होते. परिणामी, शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. बुधवारी (ता.27) पणन महासंघाने अमरावती येथून राज्यस्तर कापूस खरेदीला सुरवात केली. यानंतर शुक्रवारी (ता.29) पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आर्णी तसेच पुसद कापूस संकलन केंद्र सुरू करण्यात आले. दरवर्षी काटापूजनावर समाधान मानणाऱ्या महासंघाला यंदा पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

550 क्विंटल कापसाची खरेदी

आर्णी येथे दोन हजार 400 क्विंटल तर पुसद केंद्रावर 550 क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. आर्णी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे खरेदीची सुरवात करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, पणन संचालक सुरेश चिंचोळकर, महासंघाचे विभागीय व्यवस्थापक सी. पी. गोस्वामी, उपसभापती नुनेश्‍वर आडे, राजू बुटले, रवींद्र नालमवार, भोईदास पेंदोर, उमेश ठाकरे, संदीप देशमुख उपस्थित होते. प्रथम गाडीचा मान तेंडोली येथील शेतकरी रविशंकर परशराम राठोड यांना मिळाला. यानंतर पुसद येथील जगदंबा ऍग्रो इंडस्टीज वरुड येथे सुरवात करण्यात आली. या ठिकाणी पणन महासंघाचे संचालक ययाती नाईक, सुरेश चिंचोळकर, शेतकरी प्रतिनिधी गोविंद फुके, बाजार समिती सभापती शेख कौसर शेख अक्‍सर, अभय राठोड, रवींद्र निकम यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

उद्यापासून कापूस खरेदी 

कळंब : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित मुंबई, शासकीय कापूस खरेदी शुभारंभ हंगाम 2019-20 करिता सीसीआयअंतर्गत कापूस पणन महासंघाच्यावतीने कळंब येथे कापूस खरेदी शुभारंभ सोमवारपासून (ता.दोन) सुरू होत आहे. कळंब येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डमध्ये सकाळी 11 वाजता कापूस खरेदी शुभारंभाचे उद्‌घाटन महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित मुंबईचे संचालक सुरेश चिंचोळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संचालक ययाती नाईक हे राहतील. तर शेतकरी प्रतिनिधी गोविंद मुके, पंजाबराव भिसे, विभागीय व्यवस्थापक चक्रधर गोस्वामी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, उपसभापती विवेक अंदुरकर, तुषार देशमुख (सचिव), केंद्रप्रमुख अजय पाटील हे उपस्थित राहणार आहेत. शासकीय कापूस खरेदी सुरू होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विक्रीसाठी आणावा, असे आवाहन संचालकांतर्फे करण्यात आले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com