जि. प. अध्यक्षांनी काढला वाहनावरील अंबर दिवा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

नागपूर - शासकीय वाहनावरील लाल आणि अन्य दिवे काढण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे स्वागत करीत जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांनी आपल्या शासकीय वाहनावरील अंबर दिवा काढून राजशिष्टाचार विभागाकडे जमा करण्याचा निर्णय घेतला. एक मेपासून मंत्री, अधिकारी यांच्या वाहनांवरील लाल व इतर दिवे काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारचे आदेश येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांपासून महापौरांपर्यंत सर्वांनी आपले वाहनांचे लाल व अंबर दिवे काढले. केंद्र सरकारने वाहनांवरील अंबर दिवा काढण्याचे जाहीर केले, तेव्हा अध्यक्ष निशा सावरकर या सिक्कीम दौऱ्यावर होत्या.

नागपूर - शासकीय वाहनावरील लाल आणि अन्य दिवे काढण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे स्वागत करीत जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांनी आपल्या शासकीय वाहनावरील अंबर दिवा काढून राजशिष्टाचार विभागाकडे जमा करण्याचा निर्णय घेतला. एक मेपासून मंत्री, अधिकारी यांच्या वाहनांवरील लाल व इतर दिवे काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारचे आदेश येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांपासून महापौरांपर्यंत सर्वांनी आपले वाहनांचे लाल व अंबर दिवे काढले. केंद्र सरकारने वाहनांवरील अंबर दिवा काढण्याचे जाहीर केले, तेव्हा अध्यक्ष निशा सावरकर या सिक्कीम दौऱ्यावर होत्या. सोमवारी दौरा आटोपून जिल्हा परिषदेत पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या वाहनावरील दिवा काढून घेतला. 

Web Title: lamp on the vehicle drawn by the zp president