राष्ट्रीय ऍग्रोव्हिजन प्रदर्शनाचे भूमिपूजन

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः रेशीमबाग मैदानावर 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, कार्यशाळा व परिसंवादाचा भूमिपूजनाचा सोहळा थाटात पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हे प्रदर्शन भरविले जाते.

महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. मिलिंद माने, डॉ. सहातपुरे, चेतना टांक, गिरीश देशमुख, संध्या गोतमारे, अविनाश ठाकरे, संजय टेकाडे, शरद डोणेकर, प्रदर्शन आयोजन सचिव रमेश मानकर, रवी बोरटकर, सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. माई आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
गेल्या ऍग्रोव्हिजनच्या सर्व सत्रांना शेतकरी, शेतीसंबंधित सर्वांचा भरगोस प्रतिसाद लाभला होता.
याही वर्षी अनेक कंपन्यांनी प्रदर्शनात आपला सहभाग निश्‍चित केला असल्याची माहिती रवी बोरटकर यांनी यावेळी दिली. प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी विविध कार्यशाळा, परिसंवाद, बियाणे, खते, कृषीविषयक उपकरणे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारे स्टॉल, बॅंका तसेच सहकारी विभागही सहभागी होणार आहेत.

प्रदर्शनासाठी 10 हजार चौरस मीटरच डोम, मोठ्या उपकरणांसाठी चार हजार चौरस मीटर आकाराचे ओपन हॅंगर उभारण्यात येणार आहेत. कार्यशाळेसाठी बाराशे चौरस मीटरचे तीन हॉल्स तसेच पंधराशे चौरस मीटर आकाराचे पशुधन दाल असा एकंदरी 17 हजार चौरस मीटरचा परिसर प्रदर्शनाचा राहणार आहे. मध्ये भारतातील सर्वांत मोठे प्रदर्शन म्हणून ऍग्रोव्हिजन प्रदर्शनाला ओळखले जाते. 22 ते 25 नोव्हेंबर या दरम्यान रेशीमबाग मैदानावर ते भरविले जाणार आहे. प्रदर्शनात सहभाग नोंदवण्यासाठी इच्छुकांनी ऍग्रोव्हिजन सचिवालय, गोविंद अपार्टमेंट, शंकरनगर चौक किंवा 0712-2555249, 2544929 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रवी बोरटकर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com