अदानीला दिलेली जमीन रद्द

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

नागपूर  : राज्य शासनाने ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील लोहारा गावात अदानीला दिलेली जमीन उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केली. न्या. सुनील शुक्रे आणि न्या. श्रीराम मोडक यांनी हायकोर्टातील याचिका निकाली काढत अदानीला दिलेली जमीन रद्द केली. कोळसा खाणीकरिता अदानीला लोहारा (इस्ट) येथे ब्लॉक देण्यात आला होता. कोळसा खाणीकरिता अदानीला जमीन दिल्यामुळे सृष्टी पर्यावरण मंडळ व बंडू धोत्रे यांच्या इको प्रो या संस्थेने हायकोर्टात जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले होते. गेल्या नऊ वर्षांपासून ही याचिका प्रलंबित होती.

नागपूर  : राज्य शासनाने ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील लोहारा गावात अदानीला दिलेली जमीन उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केली. न्या. सुनील शुक्रे आणि न्या. श्रीराम मोडक यांनी हायकोर्टातील याचिका निकाली काढत अदानीला दिलेली जमीन रद्द केली. कोळसा खाणीकरिता अदानीला लोहारा (इस्ट) येथे ब्लॉक देण्यात आला होता. कोळसा खाणीकरिता अदानीला जमीन दिल्यामुळे सृष्टी पर्यावरण मंडळ व बंडू धोत्रे यांच्या इको प्रो या संस्थेने हायकोर्टात जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले होते. गेल्या नऊ वर्षांपासून ही याचिका प्रलंबित होती. मंगळवारी याचिका सुनावणीला आली असता हायकोर्टाने अदानीला आवंटित केलेली जमीन रद्द करून याचिका निकाली काढली. दरम्यान, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अदानीला अनुमती दिली नाही. तसेच मंत्रालयाने अदानीला दिलेली लीज रद्द केली होती. सृष्टी पर्यावरण मंडळातर्फे ऍड. कार्तिक शुकुल, पर्यावरण मंत्रालयातर्फे ऍड. रवी सन्याल, याचिकाकर्त्यातर्फे ऍड. नीरज खांदेवाले यांनी बाजू मांडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Land given to Adani can be canceled