सफर विदर्भाची : पंतप्रधान राजीव गांधींनी केले होते या धरणाचे भूमिपूजन 

श्रीकांत पनकंटीवार 
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

राज्याच्या ईशान्य भागात भंडारा जिल्हा वसलेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेला मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्हा, पूर्वेकडे गोंदिया, दक्षिणेला चंद्रपूर व पश्‍चिमेला नागपूर जिल्हा आहे. विविध निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या भंडारा जिल्ह्याच्या गोसे (ता. पवनी) येथे वैनगंगा नदीवरील या गोसेखुर्द धरणाने पर्यटकांना भुरळ घातली आहे. सध्या गोसेखुर्द धरण पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आला असून दररोज शेकडो पर्यटक येथे भेट देतात. 

भंडारा : पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना संजीवनी देण्यासाठी गोसेखुर्द धरण तयार करण्याची योजना आखण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्दच्या भूमिपूजनासाठी ते स्वत: भंडारा जिल्ह्यात दाखल झाले होते, ती तारीख होती 22 एप्रिल 1988. भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी गोसेखुर्द धरणाची पायाभरणी करण्यात आली. 

Image may contain: one or more people and outdoor
भूमिपूजन प्रसंगी उपस्थितांना करताना तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी.

यावेळी भूमिपूजन समारंभासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, राज्यपाल ब्रह्मानंद रेडी, चिमूरचे खासदार तथा माजी केद्रियमंत्री विलास मुत्तेमवार, अड्याळचे आमदार विलास श्रृंगारपवार, साकोलीचे आमदार जयंत कटकवार आदी नंतेमंडळी उपस्थित होते. विदर्भातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या या धरणाला तत्कालीन वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केले होते. 

Image may contain: sky, ocean, bridge, cloud, outdoor and water

राज्याच्या ईशान्य भागात भंडारा जिल्हा वसलेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेला मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्हा, पूर्वेकडे गोंदिया, दक्षिणेला चंद्रपूर व पश्‍चिमेला नागपूर जिल्हा आहे. विविध निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या भंडारा जिल्ह्याच्या गोसे (ता. पवनी) येथे वैनगंगा नदीवरील या गोसेखुर्द धरणाने पर्यटकांना भुरळ घातली आहे. सध्या गोसेखुर्द धरण पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आला असून दररोज शेकडो पर्यटक येथे भेट देतात. 

Image may contain: bridge, sky, plant, outdoor, water and nature

राज्यात तलावाचा जिल्हा म्हणून भंडाऱ्याची ओळख आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वाहत्या पाण्यावर बांधलेले अनेक बांध, बंधारे, धरणे, तलाव आहेत. मात्र, बारामाही वाहणाऱ्या वैनगंगेवर बांधलेले गोसेखुर्द धरण पर्यटकांसाठी आकर्षण आहे. इंदिरा गांधी प्रकल्प असे नाव असलेल्या या प्रकल्पाला गोसेखुर्द धरण म्हणून ओळख आहे. या धरणाचे भूमिपूजन तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते 22 एप्रिल 1988 मध्ये झाले होते. 

नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेती ओलिताखाली यावी, या करिता या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या गोसेखुर्दच्या पाण्यामुळे शेतीला तर फायदा झालाच आहे. शिवाय पाण्यावर वीजनिर्मीतीदेखील वाव मिळाला आहे. 

धरणाचे वैशिष्ट्य 
वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द धरणाला 33 वक्रद्वार आहे. पूर्व विदर्भात सपाट मैदानावर तयार केलेला एकमेव धरण आहे. 92 मीटर उंच आणि 653 मीटर लांबीचे कन्जेंट गुरूत्व धरण आहे. या धरणात 245 मीटर पाणीसाठा केला जाणार आहे. यामुळे समुद्रासारखे अथांग पाणी दर्शन होत असलेल्या या गोसेखुर्द धरणाला पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. 

उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य 
गोसेखुर्द धरण असलेल्या पवनी तालुक्‍यातच उमरेड-पवनी- कऱ्हांडला अभयारण्य आहे. निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केल्याने पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. अभयारण्य वाघांच्या प्रजननाकरिता सुरक्षित केल्याने येथे वाघांची संख्या समाधानकारण आहे. भंडारा येथून 60 किलोमीटर तर नागपूर येथून 58 किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य वसलेले असून गोसेखुर्द प्रकल्प बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य एक चांगली संधी आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा जय नावाचा वाघ याच अभयारण्यात होता. मात्र, मागील दोन वर्षांपासून तो बेपत्ता आहे. 

Image may contain: outdoor

कसे पोहोचाल? 

विमान : देशभरातून कोणत्याही विमानतळावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ नागपूरपर्यंत विमानसेवा उपलब्ध. यानंतर पुढील प्रवास वाहनाने करावा लागतो. 
रेल्वेने : नागपूर रेल्वे स्टेशन ते वरठी रेल्वे स्टेशन (भंडारा) पर्यंत. (एक तासांचा प्रवास) 
रस्तेमार्ग : नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गाने प्रवास (60 किलोमीटर) यानंतर पवनी येथे 40 किलोमीटरचा प्रवास. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: land worship ceremony of gosekhurd dam was performed by Prime Minister Rajiv Gandhi