अरमेनिया पंतप्रधानांच्या विमानाचे "लॅंडिंग'

नागपूर : अरमेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांचे स्वागत करताना जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल, शेजारी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातील उपमंत्री व इतर.
नागपूर : अरमेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांचे स्वागत करताना जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल, शेजारी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातील उपमंत्री व इतर.

नागपूर : विमानातील इंधन भरण्यासाठी आज सायंकाळी अरमेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांचे विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना संत्रानगरीबाबत माहिती दिली.
अरमेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान आज दुपारी चार वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळावर उतरले. विमानात इंधन भरण्यासाठी ते विमानतळावर थांबले. जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे उपस्थित होते. विमानतळावरील व्हीआयपी कक्षात जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी पंतप्रधान निकोल पाशिनयान यांना संत्रानगरीचे महत्त्व, येथील संस्कृती, इतिहास आदींची माहिती दिली. निकोल पाशिनयान यांच्या सोबत त्यांच्या पत्नी ऍन्ना हाकोबयान, विदेश मंत्रालयाचे उपमंत्री व्हेट डोन्टस, उच्च तंत्र उद्योगमंत्री हाकोब अर्शाक्‍यान यांच्यासह अर्थमंत्री आणि शिष्टमंडळ होते. या धावत्या भेटीनंतर पंतप्रधान निकोल पाशिनयान व्हिएतनाममधील हनोई शहराकडे रवाना झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com