दीड डझनावर रेल्वेगाड्या विलंबाने

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

नागपूर - उत्तरेकडील भागांमध्ये दाट धुक्‍याचे साम्राज्य आहे. त्याचा परिणाम रेल्वेच्या गतीवर झाला आहे. रविवारी दीड डझनावर रेल्वेगाड्या विलंबाने नागपुरात पोहोचल्या. हजरत निजामुद्दीन-चेन्नई सेंट्रल दुरांतो सर्वाधिक 14 तास उशिरा धावत होती. गाड्या विलंबाने असल्याने दुसऱ्या गाडीत जागा मिळण्यासाठी प्रवाशांना धावाधाव करावी लागली.

नागपूर - उत्तरेकडील भागांमध्ये दाट धुक्‍याचे साम्राज्य आहे. त्याचा परिणाम रेल्वेच्या गतीवर झाला आहे. रविवारी दीड डझनावर रेल्वेगाड्या विलंबाने नागपुरात पोहोचल्या. हजरत निजामुद्दीन-चेन्नई सेंट्रल दुरांतो सर्वाधिक 14 तास उशिरा धावत होती. गाड्या विलंबाने असल्याने दुसऱ्या गाडीत जागा मिळण्यासाठी प्रवाशांना धावाधाव करावी लागली.

धुक्‍यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या गाड्या विलंबाने धावत असल्याने त्यांचा परतीचा प्रवासही उशिराच सुरू आहे. रविवारी 12410 गोंडवाना एक्‍स्प्रेस 12 तास, 12724 तेलंगणा एक्‍स्प्रेस 9.45 तास, 02822 संत्रागाछी-पुणे विशेष 6.30 तास, 12615 ग्रॅण्ड ट्रॅंक एक्‍स्प्रेस 5.45 तास, 12616 ग्रॅण्ड ट्रॅंक 12 तास, 12405 भुसावळ-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्‍स्प्रेस 3.45 तास, 16032 अंदमान एक्‍स्प्रेस 8 तास, 12621 तमिलनाडू एक्‍स्प्रेस 3 तास, 12642 तिरुकुरला एक्‍स्प्रेस 8.30 तास, 13425 मालदा-सुरत एक्‍स्प्रेस 2 तास, 12130 आझाद हिंद एक्‍स्प्रेस 2.30, 12723 तेलंगणा एक्‍स्प्रेस 2 तास, 12406 हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्‍स्प्रेस 2.15 तास, 12649 संपर्कक्रांती एक्‍स्प्रेस 1.15 तास, 12722 दक्षिण एक्‍स्प्रेस 4.30 तास, 12152 समरसता एक्‍स्प्रेस 2.30 तास, 12296 संघमित्रा एक्‍स्प्रेस 7 तास आणि 12450 गोवा संपर्कक्रांती एक्‍स्प्रेस 2 तास विलंबाने धावत होत्या.

रेल्वेच्या नियमानुसार 3 तासांपेक्षा अधिक विलंबाने धावणाऱ्या गाड्यांचे तिकीट असणाऱ्या प्रवाशांना पर्यायी गाडीत बसून जाण्याची परवानगी दिली जाते. पूर्वनियोजित कामे असणाऱ्यांना पर्यायी गाड्यांमधून प्रवासाची परवानगी मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.

पार्किंग, प्रतीक्षालये हाउस फुल्ल
गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना तासनतास रेल्वेस्थानकावर ताटकळत बसावे लागत आहे. प्रतीक्षालयेच काय फलाटावरही तोबा गर्दी दिसून येत आहे. गाडी येईपर्यंत सोडण्यासाठी येणारेही थांबतात. त्यांच्या गाड्या, शिवाय वर्षाचा पहिला दिवस असल्याने टेकडी गणेश मंदिरात येणारे भाविक रेल्वेच्या पार्किंगमध्येच गाड्या लावत होते. परिणामी पार्किंगच्या जागेवर एकही अधिक वाहन ठेवण्याची जागा शिल्लक नसल्याचे चित्र रविवारी बघायला मिळाले.

Web Title: Late going trains