Video : बंदला हिंसक वळण; अमरावतीत लाठीहल्ला, नागपूर शांत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 January 2020

अमरावती : बहुजन वंचित आघाडीतर्फे शुक्रवारी (ता. २४) पुकारलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान कार्यकर्त्यांनी दुकानांवर दगडफेकीचा प्रयत्न करताच पोलिसांनी सौम्य बळाचा केला. यावेळी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

अमरावती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून आंदोलकांचा जमाव शहराकडे दुकाने बंद करण्यासाठी निघाला. त्यापूर्वी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. तेथून निघलेला जमाव झेंडे फडकवित व घोषणा देत अनियंत्रित स्वरुपात शहराकडे निघाला. उड्डाणपुलाच्या पायथ्याशी असलेल्या दुकानांवर दगड भिरकावत दुकाने जबरीने बंद करण्याचा प्रयत्न केला.

आंदोलकांवर सौम्य लाठीमार
पोलिसांनी असा उपद्रव करू नका, असे म्हणत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान आक्रमक कार्यकर्यातांनी पोलिसांशी देखील झटापट केली. त्यामुळे पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. या कारवाईदरम्यान निवडक 15 कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.

No photo description available.

नागपुरात बंदला अल्प प्रतिसाद
नागपूर : नागपुरात बाजारपेठ वेगळता इतर सर्व काही सुरळीत सुरू होते.
सीएए व एनआरसीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यांच्या बंदला अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी समर्थन दिले आहे. येथे सकाळपासून बंद पाळण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष रवी शेंडे यांच्या नेतृत्त्वात सीताबर्डी येथून रॅली काढण्यात आली. आंनद टॉकिज मार्गे संपूर्ण सीताबर्डी भागात ही रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येन कार्यकर्ते उपस्थित होते. रॅलीच्या माध्यमातून बाजारपेठ, दुकान बंद करण्याचे आहवान करण्यात आले.

Image may contain: 3 people, people standing, people walking and outdoor

याला दुकानदारांनी प्रतिसादही दिला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधानसभानिहाय बंदची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली होती. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बंद ठेवण्यासाठी दुकानदारांना विनंती करीत होते. शाळा, औषध दुकाने, रुग्णालय सुरू होते. राज्यातील काही भागात आंदोलनाला हिंसक वळण लागले असले तरी नागपुरात दुपारपर्यंत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना झाली नसल्याची खात्रीलायक माहिती आहे.

बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात ठेवण्यात आला होता. शहरात जागोजागी बॅरिगेट्‌स लावण्यात आले होते. सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यादक्षता पोलिसांकडून घेण्यात आली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lathicharge on agitators at amravati