जुन्या दागिन्यांवर एलबीटीत सवलत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

नागपूर - शहरातील नागरिकांकडून सराफांनी खरेदी केलेल्या जुन्या सोने-चांदीच्या दागिन्यांवर एलबीटीत सवलत देण्यात येणार आहे. मात्र, शहराच्या बाहेरील नागरिकांकडून दागिने खरेदी केल्यास एलबीटी आकारण्यात येणार आहे, अशी माहिती सोना-चांदी ओळ कमिटीचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर आणि सचिव राजेश रोकडे यांनी दिली. 

नागपूर - शहरातील नागरिकांकडून सराफांनी खरेदी केलेल्या जुन्या सोने-चांदीच्या दागिन्यांवर एलबीटीत सवलत देण्यात येणार आहे. मात्र, शहराच्या बाहेरील नागरिकांकडून दागिने खरेदी केल्यास एलबीटी आकारण्यात येणार आहे, अशी माहिती सोना-चांदी ओळ कमिटीचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर आणि सचिव राजेश रोकडे यांनी दिली. 

सोना-चांदी ओळ कमिटीच्या सदस्यांना व सराफा व्यापाऱ्यांना मनपाच्या एलबीटी विभागाकडून स्थानिक नागरिकांकडून खरेदी केलेल्या जुन्या सोने-चांदीच्या दागिन्यांवर एलबीटी, अतिरिक्त शुल्क व व्याज भरण्याची डिमांड नोट पाठविण्यात आली आहे. त्यामुळे सराफा व्यापारी अडचणीत आल्याने त्यातून सूट मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया आणि नागविदर्भ चेंबरचे अध्यक्ष हेमंत गांधी, सचिव संजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांची भेट घेऊन दिले. प्रतिनिधी मंडळाने अध्यक्षांना तांत्रिक बाबी समजावून सांगितल्यानंतर त्यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. व्यापाऱ्यांकडून आणि मनपा अधिकाऱ्यांकडून याबाबत चर्चा केली. हा विषय नगरविकास खात्याकडे प्रलंबित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे कुकरेजा यांनी नगरविकास खात्याकडून निर्णय झाल्यानंतर स्थानिकांकडून सराफांनी जुने सोने-चांदीचे दागिने खरेदी केलेल्या दागिन्यांवर एलबीटी आकारण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे सराफा व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मात्र, शहराबाहेरून आलेल्या सोने-चांदीच्या जुन्या दागिन्यांवर एलबीटी आकारण्यात येईल, असेही स्पष्ट केले. बैठकीला सुनील अग्रवाल, संजय बंगाले, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, संस्थेचे उपाध्यक्ष राजकुमार गुप्ता, पुरुषोत्तम कावळे, माजी कोषाध्यक्ष पंकज बखाई उपस्थित होते.

 

Web Title: LBT Concession on Old Jewellery