साहित्याच्या मांडवात नेत्यांच्या मुलाखती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार या तिघांच्या प्रकट मुलाखती यंदाच्या जागतिक मराठी संमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने ४, ५ व ६ जानेवारीला या संमेलनाचे वनामतीच्या सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.  

‘शोध मराठी मनाचा’ संकल्पनेवर आधारित या संमेलनाचे उद्‌घाटन ४ जानेवारीला (शुक्रवार) दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होईल. संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार आणि स्वागताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असेल. उद्‌घाटन सोहळ्यानंतर लगेच ज्येष्ठ कवी-चित्रपट निर्माते रामदास फुटाणे आणि प्रसिद्ध बांधकाम उद्योजक आशुतोष शेवाळकर, मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत घेतील. त्यानंतर विविध देशांमध्ये स्थायिक मराठी माणसांचे ‘सातासमुद्रापलीकडे’ हे सत्र होईल. ५ जानेवारीला सकाळी १० वाजता ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांची प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होईल.

Web Title: Leader Interview in Sahitya Sammelan Hall