सावरकरांचा अपमान करण्याऱ्यांसोबत चहापान नाही : देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

हिवाळी अधिवेशनासाठी विरोधी पक्षांचे सर्व सदस्य नागपूरला दाखल झाले आहेत. आज रविभवन येथे विरोधकांची बैठक झाली. यात सावरकरांचा अपमान, विकासकामांना देण्यात आलेली स्थगिती यामुळे सरकारला अधिवेशनात सहकार्य करायचे नाही, असा निर्णय घेण्यात आला. या मुद्यांवर सरकारला घेरण्याचेही ठरवण्यात आले. यानंतर फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जोपर्यंत राहुल गांधी जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत आमचा विरोध कायम राहील असा इशाराही दिला. 

नागपूर : सत्तेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना मांडीला मांडी लाऊन बसली आहे. अशा लाचार महाविकासआघाडीच्या सरकारसोबत आम्हाला चहापान घ्यायचा नाही, असे सांगून माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकाराच्या चहापानावर बहिष्कार असल्याचे जाहीर केले. 

राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी 
हिवाळी अधिवेशनासाठी विरोधी पक्षांचे सर्व सदस्य नागपूरला दाखल झाले आहेत. आज रविभवन येथे विरोधकांची बैठक झाली. यात सावरकरांचा अपमान, विकासकामांना देण्यात आलेली स्थगिती यामुळे सरकारला अधिवेशनात सहकार्य करायचे नाही, असा निर्णय घेण्यात आला. या मुद्यांवर सरकारला घेरण्याचेही ठरवण्यात आले. यानंतर फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जोपर्यंत राहुल गांधी जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत आमचा विरोध कायम राहील असा इशाराही दिला. 

Image may contain: 8 people

अधिक वाचा - Exclusive : अमितभाई 'मातोश्री'वर जाणार होते; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा

सत्तेसाठी शिवसेना लाचार 
सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करली आहे. आम्ही गांधी आणि नेहरू यांचा सन्मान करतो तुम्ही सावरकरांचा करावा अशी तडजोडीची भाषा आता वापरली जात आहे. सावरकरांबाबात कालपर्यंत शिवसेनेची भूमिका वेगळी होती. त्यांनी केलेली आपली वक्तवे बघावी. सत्तेसाठी कोणी इतका कसा लाचार होऊ शकतो याचेच आश्‍चर्य वाटते. आता शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी स्वीकारायची की सत्तेतून बाहेर पडायचे हे ठरवावे. 

विरोधकांचा बहिष्कार 
सावरकरांच्या अपमानामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. सर्वच जण राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करीत आहेत. राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती आणि स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना माहिती नाही. केवळ नाव गांधी आहे म्हणून कोणी महात्मा गांधी होऊ शकत नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यावेळी हाणला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leader of opposition devendra fadanvis Boycott tea party