... तर 10 रुपये थाळीचं होईल "झुनका भाकर' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

या योजनेची अवस्था सन 1995 मध्ये घोषित केलेल्या झुणका-भाकर केंद्रासारखी होऊ नये, असा चिमटा शिवसेनाला काढला. एक रुपयात क्‍लिनिकल सुविधा देण्याची केलेली घोषणा स्तुत्य आहे. परंतु, सद्यस्थितीत प्रत्येक सार्वजनिक आरोग्य केंद्राला एमबीबीएस दर्जाचे वैद्यकीय अधिकारी नाही.

नागपूर : दहा रुपयांमध्ये जेवणाची थाळी, अशी घोषणा राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी त्यांच्या अभिभाषणात केली आहे. मात्र, या योजनेची अवस्था सन 1995 मध्ये घोषित केलेल्या झुणका-भाकर केंद्रासारखी होऊ नये, असा चिमटा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज सभागृहात शिवसेनाला काढला. 

चर्चेदरम्यान सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दरेकर यांनी सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, दहा रुपयांमध्ये जेवणाची थाळी, अशी घोषणा राज्यपाल यांच्या अभिभाषणात केली आहे. मात्र, या योजनेची अवस्था सन 1995 मध्ये घोषित केलेल्या झुणका-भाकर केंद्रासारखी होऊ नये, असा चिमटा शिवसेनाला काढला. एक रुपयात क्‍लिनिकल सुविधा देण्याची केलेली घोषणा स्तुत्य आहे. परंतु, सद्यस्थितीत प्रत्येक सार्वजनिक आरोग्य केंद्राला एमबीबीएस दर्जाचे वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे सर्वप्रथम किमान मूलभूत सुविधा पुरविणे ही प्राथमिकता असावी, अशी सूचना त्यांनी केली. 


विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

हेही वाचा - पहिल्या तडफदार भाषणाने जिंकले मन, सदस्य म्हणाले त्यांना बोलू द्या

हेक्‍टरी 25 हजारांची मदत न मिळाल्यास रस्त्यावर उतरू 
राज्यातील अवकाळी पावसामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिहेक्‍टरी 25 हजार रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी; अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज सभागृहात दिला. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एकूण दहा हजार कोटींची घोषणा केली होती. मात्र, पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून केवळ चार हजार 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील भव्य स्मारकाबाबत कोणताच उल्लेख नाही. 

महत्त्वाची बातमी - मुख्यमंत्री महोदय, हे शिवाजी पार्क नाही

कर्जमाफीबाबत सांगता येणार नाही : अजित पवार 
नागपूर : महाआघाडीत सहभागी झालेल्या सर्वच पक्षांच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा होता. ती आम्ही देणारच आहोत, मात्र केव्हा देणार हे आताच सांगता येणार नसल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यामुळे दोन्ही सभागृहात विरोधकांतर्फे गोंधळ घालण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मागील सरकारची कर्जमाफी दीड वर्षे चालली याकडेही त्यांनी लक्ष वेधले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leader of opposition pravin darekar reminds about zunka bhakar scheme