पुसद-वाशीम मार्गावर बिबट्या दिसला

file photo
file photo

पुसद (जि. यवतमाळ) : पुसद-वाशीम मार्गावर येलदरी पॉइंटजवळ रविवारी (ता. 7) सकाळी साडेसातच्या सुमारास मार्ग ओलांडताना दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दिनकर बाजड यांना कार चालविताना पट्टेदार वाघ दिसला. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या "पगमार्क' तपासणीत तो वाघ नसून बिबट असावा, असा निष्कर्ष काढण्यात आला.
पुसद वनविभागातील खंडाळा जंगलात वन्यप्राण्यांचा वावर असतो. पुसद-वाशीम मार्गावर खंडाळा घाटात बऱ्याचदा रोही, हरिण यांचे कळप रस्ता वेगात ओलांडतात. त्यामुळे या मार्गावर वाहनचालक सावध असतात. रविवारी सकाळी डॉ. बाजड आपल्या कारने वाशीमला जात असताना येलदरी पॉइंटजवळ अचानकपणे वाघाने वेगात रस्ता ओलांडला. त्यांनी दैनिक "सकाळ'ला लगेच मोबाईलवरून कळविले. वाघ डाव्या बाजूच्या मनसळ जंगलात शिरल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात पुसद वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांना कळविण्यात आले. त्यांनी पुसद वनपरिक्षेत्राधिकारी संदीप गिरी यांना चौकशीचे निर्देश दिले. श्री. गिरी यांनी वनकर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळ गाठले. तेव्हा "पगमार्क' दिसून आलेत. शहानिशा केली असता, हे पगमार्क सहा सेंटिमीटर आकाराचे असल्याने तो वाघ नसून बिबट असावा, असा निष्कर्ष काढण्यात आला. साग जंगलात तो थांबलेल्या जागेवर केसही आढळून आलेत.
बिबट्यांचा अधिवास!
पुसद वनपरिक्षेत्रातील खंडाळा व बेलगव्हाण या जंगलात बिबट्यांचा अधिवास आहे. उन्हाळ्यात जंगलातील वनविभागाने तयार केलेल्या पाणवठ्यावर बिबट कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसून आलेले आहेत. शिवाय अस्वल, रान मांजर या प्राण्यांचे वास्तव आढळून आले. मात्र, वन्यजीव व मानव हा संघर्ष दिसून आलेला नाही. याचा अर्थ जंगलात खाद्य व पाणी उपलब्ध असल्याने हे जंगल "हेल्दी' असल्याचा वनविभागाचा दावा आहे.

वनविभागातील खंडाळा जंगलात वाघाची शक्‍यता कमी आहे. एक तर आजूबाजूला कुठलाही व्याघ्रप्रकल्प नाही. तरीही या जंगलात निगराणी ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्यात येतील.
- अरविंद मुंढे, उपवनसंरक्षक, पुसद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com