कापसातील रुई, सरकीची माहिती जाणून घ्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 डिसेंबर 2019

कापसाचे दर साधारणत: रुई आणि सरकीच्या दरावर अवलंबून असते. विकत असलेल्या कापसात या दोन्ही प्रकाराचे प्रमाण काय, याची माहिती शेतकऱ्यांना तर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही नसते. आता ही माहिती शेतकरी आणि व्यापाऱ्यांना हिंगणघाटात होणार आहे. 

हिंगणघाट (जि. वर्धा) : केंद्रीय कापूस औद्योगिक संस्था नागपूर, हिंगणघाट कृषी बाजार उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्‍त विद्यमाने बाजार समितीत प्रकल्प सुरू होत आहे. भारतातील प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार हा एकमेव प्रकल्प आहे. प्रकल्पाचा आरंभ मंगळवारी (ता. 31) सकाळी साडेनऊ वाजता समितीच्या कापूस यार्डवर होणार आहे. 

No photo description available.

सरकी व रुईचे वेगवेगळे भाव 

साधारणत: कापसामध्ये 65 टक्के सरकी, 34 टक्के रुई व एक टक्‍का प्रक्रिया अंतर्गत तुटीचे प्रमाण असते. विदर्भात सरासरी रुईचे प्रमाण 33 टक्‍क्‍यापर्यंत आहे. 65 टक्के सरकी असली; तरी सरकी व रुईच्या दरात फार मोठा फरक आहे. रुईचे दर 114 रुपये असून सरकीचे दर 24 रुपये किलोपर्यंत आहे. कापसाचे दर हे रुई व सरकीच्या प्रमाणावर अवलंबून आहे. 

 जाणून घ्या : तुम्ही सोशल मीडियाच्या आहारी गेले ना... मग हे वाचाच

रुई जास्त असणाऱ्या कापसाची लागवड करा 

त्यानुसार कच्चा कापसाला दर मिळणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेऊन जर शेतकऱ्यांचे रुईचे प्रमाण जास्त असणाऱ्या कापसाच्या प्रजातींची लागवड केल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होण्याची मोठी शक्‍यता आहे. कापसाचे हे अर्थकारण कापूस उत्पादक, खरेदीदाराला अवगत होण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

हेही वाचा की : विदर्भात मंगळवारपासून वादळी पावसाची शक्‍यता

शेतकऱ्यांनी कापसाचे अर्थकारण समजून घ्यावे 

शेतकरी बांधवांनी कापसाचे अर्थकारण समजून घेण्याच्या दृष्टीने त्यांनी लागवड केलेल्या कापसामध्ये रुईचे प्रमाण किती आहे. याबाबत तपासणी करून घ्यावी. जेणेकरून आपल्या कापसाला स्पर्धेमध्ये कुठे दर जास्त मिळू शकते हा पर्याय त्यांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने समितीचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाच्या आरंभाकरिता मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे सभापती ऍड. सुधीर कोठारी यांनी केले. 

यावेळी समितीचे संचालक हरीश वडतकर, मधुकर डंभारे, मधुसुदन हरणे, शेषकुमार येरलेकर, संजय तपासे, ओमप्रकाश डालीया, उत्तमराव भोयर, अशोक उपासे, विनोद वानखेडे, राजेश मंगेकर, सुरेश सातोकर, बापूराव महाजन, बळीराम नासर, सुरेश वैद्य, पंकज कोचर, राजेश कोजसर, संजय जैन, संजय कातरे, सुरेखा सायंकार, माधुरी चंदनखेडे व सचिव टी. सी. चांभारे यांची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Learn the details of cotton rui, cotton sarki at wardha