इथेच शिकून, पण तिकडे जाणार नाही

सतीश घारड
शनिवार, 15 डिसेंबर 2018

टेकाडी (नागपूर) : हेच शाळा चांगली आहे. अजून खदाणीच्या दगाणीन पडली बी नाय. आमच्या घरची भीत पाह्याटले दगाणीन पडली होती. माय, बहीण अन्‌ मी दबली होती त्याच्यात. तवा त कोणी नाही आलत आम्हाले पाहाले. तुम्हीच सांगा सर पह्यले का बदलवाले पाह्यजे आमचे घर का शाळा. आम्ही इथेच शिकून पण तिकडे जाणार नाही, अशी आठव्या वर्गातील विद्यार्थिनी पूनम रामाजी वाघाडे (13, रा. गोंडेगाव) म्हणाली.

अजी आमची जुनीच शाळा चांगली आहे. नवीन शाळा खूप दूर आहे. आमचे आईबाबा पाठवत नाही तिकडं. आमचं घर ही नाही आहे तिथं. आमचे मास्तर गेले त जाऊद्या, ताई चांगल्या शिकवते. परंतु, तुमची जुनी शाळा जीर्ण झाली आहे. वेकोलिच्या दगाणीने कधीही पळू शकते, असे सरकारचे म्हणणे आहे, या प्रश्‍नावर ती बोलकी झाली. खळखट्याक शब्दात विद्यार्थिनीने शिक्षण विभाग व वेकोलि प्रशासनासक्षम प्रश्‍न उभा केला. ज्याचे उत्तर देण्याची हिंमत कदाचीतच एखाद्या पाषाण हृदयी अधिकाऱ्याकडे असेल. पूनमने आपबीती "सकाळ' समक्ष मांडली. घटनेच्या सत्यतेसाठी सरपंच, ग्रामस्थांकडून सहनिशा केली असता अशा घटना बऱ्याच कुटुंबासोबत झाल्याचे पुढे आले.
शिक्षक विद्यार्थ्यांविना
पाच दिवसांपासून कुलूपबंद शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी शाळा थाटली असून, नवीन इमारतीत शिक्षक विद्यार्थ्यांविना आहेत. अशात प्रशासनातर्फे शाळा जीर्ण असल्याचे दाखले देत स्थलांतरण करणे खरच फोल ठरत असल्याचे निष्पन्न होते.

महिनाभरापूर्वी पहाटे झोपीत असताना वेकोलिकडून तीव्र ब्लास्टिंग करण्यात आली. यात घराची भिंत कोसळल्याने पत्नी व दोन्ही मुली दबली होती. जीवितहानी झाली नाही, हे नशीबच. घटना आठवताच आजही अंगावर शहारे येतात.
- रामाजी वाघाडे, ग्रामस्थ.

Web Title: Learning here, but not going here