कोठारीत बिबट झाला ‘सैराट’

Leopard
Leopard

कोठारी (जि. चंद्रपूर) - परिसरात आधीच वाघाची दहशत. शेतकऱ्यांनी जागलीला जाणे सोडले. त्यातच आता बिबट्याने धुमाकूळ घातला असून चार दिवसात तिघांना जखमी केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी सरळ वनविभागाचे कार्यालय गाठून त्याला कुलूप ठोकले. बिबट्याला जेरबंद करेपर्यंत कुलूप उघडणार नाही, असा इशारा दिला.

काही दिवसांपासून शेतशिवारात वाघ दिवसाढवळ्या दिसत आहे. पाळीव जनावरांवर तो हल्ले करीत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कापूस वेचणीचा काळ असतानाही शेतकऱ्यांनी शेतात जाणे सोडले. यासंदर्भात वनविभागाकडे वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदने देण्यात आली. परंतु वनविभागाने काहीच हालचाली केल्या नाहीत. वाघाच्या भीतीखाली कोठारीवासी असतानाच आता बिबट्यानेही माणसांवर हल्ले करणे सुरू केले. बिबट्याने चार दिवसात तिघांना जखमी केले. त्यामुळे गावकरी संतप्त झाले. त्यांनी वनविभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. वाघ, बिबट्या जेरबंद झाल्यानंतरच कुलूप उघडण्यात येईल, अशी भूमिका घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com