बिबट्याचा बंदोबस्त करा ; नागरिकांची मागणी

राजेश सोळंकी
सोमवार, 26 मार्च 2018

आर्वी तालुक्यातील रसूलाबाद परिसरात मागील काही दिवसांपासून बोरी बारा शिवारात बिबट्याचे वास्तव्य आहे. या शिवरात असलेल्या तलाव परीसरात भरपूर पाणी असल्यामुळे बिबट्या राहत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

आर्वी (वर्धा) : आर्वी तालुक्यातील रसूलाबाद परिसरात मागील काही दिवसांपासून बोरी बारा शिवारात बिबट्याचे वास्तव्य आहे. या शिवरात असलेल्या तलाव परीसरात भरपूर पाणी असल्यामुळे बिबट्या राहत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

जनावर यांच्यावर दिवसेंदिवस हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे. काल गायीला जखमी केले. या अगोदर ही 2 ते 3 जनावरांची शिकार या बिबट्याने केली. ही बाब वन विभाग यांना माहिती आहे. मात्र, त्यांच्याकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. त्यानंतर काल एका जनावराला जखमी केल्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे  भविष्यात माणसांवर हल्ला करू शकते, अशी भीती येथील नागरिकांना वाटत आहे. 

रसूलाबादच्या पंचायत समिती सदस्या अरुणा राजेश सावरकर यांनी आर्वी येथील वन अधिकारी यांना निवेदन देऊन या परिसरात वावरत असलेल्या बिबट्या बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली.

Web Title: Leopard Attack Animal injury Peoples Afraid