शेतकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला, प्रकृती गंभीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मेहकर - शेतातील काम आटोपून घराकडे परत येत असलेल्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.29) रात्री उशिरा घाटबोरी वनपरिक्षेत्र अंतर्गत मोहना बुद्रुक येथे घडली आहे. 

मेहकर तालुक्यातील ग्राम मोहना बुद्रुक येथील रहिवासी तुकाराम वासू जाधव (वय 52) हे बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातून घराकडे परत येत असतांना अचानक त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढविला. त्या ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्या डोक्यावर, डाव्या हातावर व पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. सदर घटनेनंतर तात्काळ त्यांना इतर शेतकऱ्यांनी जानेफळ येथील आरोग्य केंद्रात आणले असता त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारा साठी त्यांना मेहकरला हलविण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांना मध्ये दहशत 
घाटबोरी परिसरात यापूर्वी पण शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिला होता. नुकताच काही दिवस आगोदर बिबट्याने लोणी काळे परिसरात गासराचा फडशा पाडला होता. त्यानंतर बुधवारी घडलेल्या घटनेमुळे शेतकरी व शेतमजुरा मध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी व शेतमजुराकडून होत आहे.

Web Title: Leopard attack on farmers, health critical