बिबट्याने दिली झोपलेल्या युवकाच्या कानशिलात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

चिमूर (जि. चंद्रपूर) - रामदेगी येथे झाडाशेजारी झोपलेल्या युवकाच्या कानशिलात बिबट्याने पंजा मारून जखमी केले. ही आज, मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. जखमी युवकाचे नाव पद्माकर नामदेव रामटेके आहे. 

रामदेगी हे पर्यटनस्थळ आहे. येथेच पद्माकरचे छोटेसे दुकान आहे. सोमवारी रात्री त्याला उशीर झाला. त्यामुळे त्याने दुकानाशेजारी असलेल्या झाडाच्या आडोशाचा आसरा घेत अंथरून टाकले. पहाटे चार वाजताच्या सुमारास बिबट्याने त्याच्या कानशिलात पंजा मारला. त्याने आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूचे दुकानदार जागे झाले. त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. सकाळी जखमी पद्माकरला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले आहे.

Web Title: leopard attack on youth