अखेर 'तो' बिबट्या जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

या आठवड्यात खामगाव आणि नांदुरा तालुक्यातील शेत शिवारात बिबट्याने दहशत माजवली आहे. बिबटयाने हल्ला केल्याने १० शेतकरी जखमी झाले असून शेती कामे करणारे शेतमजूर घाबरले आहेत. दरम्यान शनिवारी 13 जुलै रोजी एका बिबट दिसल्या नंतर अनेक लोक त्याच्या मागे धावले.

खामगाव  : तालुक्यातील ढोरपगांव लगतच्या भागात धुमाकूळ घालत अनेक लोकांना जखमी करणाऱ्या बिबट्याला बुलडाणा वन विभागाच्या रेस्क्यू टीमने अखेर आज (रविवार) मोठ्या मेहनतीने जेरबंद केले. बिबट्या पकडला गेल्याने शेतकरी, शेतमजूर आणि गरिकांनी सोडला सुटकेचा श्वास सोडला आहे.

या आठवड्यात खामगाव आणि नांदुरा तालुक्यातील शेत शिवारात बिबट्याने दहशत माजवली आहे. बिबटयाने हल्ला केल्याने १० शेतकरी जखमी झाले असून शेती कामे करणारे शेतमजूर घाबरले आहेत. दरम्यान शनिवारी 13 जुलै रोजी एका बिबट दिसल्या नंतर अनेक लोक त्याच्या मागे धावले. मात्र अचानकपणे बिबट्या मागे वळला व त्याने लोकांवर हल्ला चढवला त्यात ५ जण जखमी झाले आहेत.

दरम्यान आज वनविभागाने पकडले आहे. खामगाव तालुक्यातील पोरज शिवारात बिबट्या असल्याची माहिती मिळाल्यावर वन विभागाच्या टीमने त्यास पिंजऱ्यात कैद केले. त्यामुळे या भागातील शेतकरी आणि नागरीकांना दिलासा मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard captured in khamgaon