महाजनपुर येथे बिबट्या जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

महाजनपुर (ता.निफाङ) येथे शिवाजी दराडे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात मादी बिबटया रविवारी (ता.12) पहाटे जेरबंद झाला आहे. शिवाजी दराडे यांच्या गट नंबर 315 या ठिकाणी वनविभागाने दोन दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात सावज म्हणून शेळी ठेवल्याने शेळीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पहाटे बिबट्या पिंजऱ्यात अलगद जेरबंद झाला.

सायखेङा- महाजनपुर (ता.निफाङ) येथे शिवाजी दराडे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात मादी बिबटया रविवारी (ता.12) पहाटे जेरबंद झाला आहे. शिवाजी दराडे यांच्या गट नंबर 315 या ठिकाणी वनविभागाने दोन दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात सावज म्हणून शेळी ठेवल्याने शेळीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पहाटे बिबट्या पिंजऱ्यात अलगद जेरबंद झाला.

काही दिवसांपासून दिसणारा बिबट्या अखेर जेरबंद झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. गोदावरी नदीच्या क्षेत्रात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असते. बिबट्या दिसणे आणि पिंजरा लावणे नित्याचेच झाले असतांना ज्या भागात लपण्यासाठी कोणतीही अडचण असनारी जागा उपलब्ध नाही. अश्या महाजनपुर शिवारकडे बिबट्याने काही दिवसांपासून आपला मुक्काम ठोकला होता. कुत्रे, शेळी, मेंढी फस्त करून आपली दहशत निर्माण केली होती. या भागात सातत्याने ग्रामस्थांना बिबटया दिसत होता. वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक व्ही. आर. टेकनर, वनसेवक भैय्या शेख, भरत माळी, पिंटु नहिरे यांनी जेरबंद बिबटयाला ताब्यात घेत, निफाडला नेले आहे.

महाजनपुर शिवारात ऊस क्षेत्र फारसे नाही शिवाय ओसाड माळरान, पडीक जमिन आहे बिबटयाला लपण्यासाठी अडचणीचे क्षेत्र नाही. तरी देखील नदीच्या परिसरात रहाणारा बिबटया या भागात आल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

Web Title: Leopard captured at Mahajanpur

टॅग्स