विहिरीत पडून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

पाण्याने भरलेल्या विहिरीत बिबट्याचा बछडा पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी उघडकीस आली. त्यानंतर वन विभागाच्या बचाव पथकाने मृत बछड्यास बाहेर काढले. येथील रहिवासी असलेल्या प्रकाश नामदेव वानेरे यांना हा बिबट्या पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आले.

बुलडाणा : पाण्याने भरलेल्या विहिरीत बिबट्याचा बछडा पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी उघडकीस आली. त्यानंतर वन विभागाच्या बचाव पथकाने मृत बछड्यास बाहेर काढले. येथील रहिवासी असलेल्या प्रकाश नामदेव वानेरे यांना हा बिबट्या पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आले.

बुलडाणा वन परिक्षेत्रांतर्गत ग्राम दत्तपूर येथील रहिवासी असलेले प्रकाश नामदेव वानेरे यांच्या पैनगंगा नदीजवळ असलेल्या गट क्रमांक 47 मधील शेतातील विहिरीत बिबट्यासारखा प्राणी पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर वानेरे यांनी या
घटनेची माहिती बुलडाणा वन विभागाला दिली. वन परिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांच्यासह बचाव पथकाचे सदस्य वनपाल राहुल चव्हाण, संजय राठोड, समाधान मांटे, विष्णू काकड, संदीप मडावी यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.
 मोरे यांना घेऊन घटनास्थळी आणले. मृत बिबट्याच्या बछड्यास बाहेर काढले. 

त्यानंतर मृत बिबट्याला घेऊन बुलडाणा येथील वन डेपोत आणले. तिथे त्या बछड्याचे शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळापासून जवळच अजिंठा पर्वतरांगा असून, या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचे अस्तित्व आहे. बऱ्याचदा हे वन्यप्राणी शेतशिवार व मानवी वस्तीकडे येतात.

Web Title: Leopard Dead in water recently Postmortam has been done