विजेच्या धक्‍क्‍याने बिबट्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

आष्टी (जि. वर्धा) : येथील वनपरिक्षेत्रातील बेलोरा जंगलव्याप्त रायपूर शिवारात बिबट्या (मादी) मृतावस्थेत आढळून आला. ही घटना शुक्रवारी (ता.14) दुपारी उघड झाली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्‍क्‍याने झाल्याचे निष्पन्न झाले. या बिबट्याचा मृत्यू चार दिवसांपूर्वी झाला.

साहूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे आणि डॉ. भांगडे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनात या बिबट्याचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाल्याचे समोर आले. त्याच्या डाव्या पायाला आणि मानेच्या डाव्या बाजूला विजेचा धक्‍का बसल्याच्या खुणा दिसून आल्या. शवविच्छेदनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बेलोरा शिवारातील रायपूर शिवारात दुर्गंधी पसरली होती. शेतकऱ्यांनी पाहणी केली असता बिबट मृतावस्थेत पडून असल्याचे आढळले. वनपरिक्षेत्राधिकारी अमोल चौधरी, वनरक्षक अवथळे आणि वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मृत बिबट सुमारे साडेतीन वर्षांचा असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. शेतातील कुंपणाला लावलेल्या वीजतारांचा स्पर्श झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाला व त्यानंतर त्याला झुडपात आणून टाकण्यात आले असावे, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Web Title: Leopard death by electric shock