पेंच प्रकल्पात बिबट्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील पेंच नदीच्या पात्रात बिबट्या मृतावस्थेत आढळला. प्रादेशिक लढाईत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला. या बिबट्याच्या शरीराचे सर्वच अवयव सुस्थितीत असल्याचेही वन विभागाने कळविले.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील दक्षिण फुलझरी बिटामध्ये गस्त करीत असताना कर्मचाऱ्यांना पूर्व पेंच वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 546 पेंच नदीच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेत बिबट्याचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच पूर्व पेंच वन परिक्षेत्रातील वन परिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी पोचले. बिबट्याची पाहणी केली असता त्याचे डोके आणि मानेवर जखमा दिसल्या. मात्र, दातासह शरीराचे संपूर्ण अवयव सुस्थितीत असल्याचे निदर्शनात आले. बिबट्याचा मृत्यू पाच ते सहा दिवसांपूर्वी झाल्याची शक्‍यताही व्यक्त केली जात आहे. एनटीसीएने दिलेल्या एसओपीनुसार बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. तसेच परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. दरम्यान, जवळच वाघाच्या पायाचे ठसे आढळल्याने वाघ आणि बिबट्याच्या लढाईत बिबट्याच्या मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्‍त केला जात आहे. या परिसरात वाघाचा मोगावा घेण्यासाठी आता कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. शवविच्छेदनानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Leopard death news