आर्वी तालुक्यात बिबट्याचा विजेच्या धक्काने मृत्यू

राजेश सोळंकी
शनिवार, 12 मे 2018

आर्वी तालुक्यातील हरदोली शिवारात एका शेतात बिबट्याचा दोन दिवसांपूर्वी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १२)  दुपारी 3 वाजता उघडकीस आली.

आर्वी : आर्वी तालुक्यातील हरदोली शिवारात एका शेतात बिबट्याचा दोन दिवसांपूर्वी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १२)  दुपारी 3 वाजता उघडकीस आली. प्रमोद माणिकराव बुरे यांचे हरदोली शिवारात शेत आहे. या शेतात दोन दिवसांपूर्वी पाण्याच्या शोधात आलेल्या या बिबट्याचा विद्युत प्रवाहाने मृत्यू झाला.. 

त्यानंतर या बिबट्याला दुसऱ्याच्या शेतात टाकून देण्यात आले. शनिवार (ता. १२) ला ही घटना उघडकीस आली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्राणीमित्रांसह जाऊन माहिती घेऊन पंचनामा केला. या शेतात उस लागवड सुरु होती. त्यामुळे गड्डे करुन तार लावण्यात आली होती. त्याने जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तारांच्या कुपनात विजेच्या प्रवाहाने मृत्यू झाला.

त्यानंतर या बिबट्याचा मृतदेहाला अग्नी देण्यात आला.
यावेळी वर्धा उपवन संरक्षण त्रिपाठी आर एल कुरवथे, चोरे , मिश्रा, कावळे प्राणीमित्र शुभम जगताप, वैष्णव काल्सर्पे, ऋषिकेश एखार, मोतू जाउरकर यांनी सहकार्य केले.

Web Title: leopard died in the Arvi taluka due to electric shock