बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

नागभीड (जि. चंद्रपूर): नागभीड वनपरिक्षेत्रात येणाऱ्या पाहर्णी बिटातील बोथली शेतशिवारात बुधवारी (ता. आठ) बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. बछड्याचे वय तीन महिने आहे. दरम्यान, अन्य प्राण्यांच्या हल्ल्यात बछड्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

नागभीडपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या बोथली गावाजवळील विलम, म्हसली, पाहर्णी बिटाचे क्षेत्र आहे. बोथली येथे निळकंठ दुधे यांचे शेत आहे. त्यांच्या परिवारातील संदीप दुधे हा बुधवारी सकाळी शेतावर गेला होता. तेव्हा त्याला मृतावस्थेत बिबट्याचा बछडा दिसून आला. त्याने याची माहिती वनविभागाचे क्षेत्र सहायक खोब्रागडे यांना दिली. वनपरिक्षेत्राधिकारी रमेश तलांडी यांनी घटनास्थळी भेट देऊन बछड्याचा मृतदेह ताब्यात घेतला.

Web Title: leopard found dead

टॅग्स