बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

आष्टी (शहीद) (जि. वर्धा) : तालुक्‍यातील पंचाळा गावापासून एक किलोमीटर उत्तरेस असलेल्या जंगलात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 13) सकाळी उघडकीस आली. जगन जंगलूजी विघ्ने (वय 55, रा. पंचाळा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
पंचाळा येथील विघ्ने गुरुवारी (ता. 12) दुपारी सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेले होते. मात्र, सायंकाळपर्यंत ते परत न आल्याने दोन्ही मुलांनी शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, शुक्रवारी (ता. 13) सकाळी जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. बिबट्याने शेतकऱ्याच्या

मानेवर हल्ला करून मनगट तोडल्याचे आढळून आले. गोळा केलेले सरपण, कुऱ्हाड, चपला व दुपट्टा मृतदेहापासून काही अंतरावर आढळले. दरम्यान, आष्टीचे वनपरिक्षेत्राधिकारी अमोल चौधरी, ठाणेदार खारतोडे घटनास्थळी पोहोचले. पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी आर्वी येथे पाठविण्यात आला. शेतकरी विघ्ने यांच्याकडे 10 एकर शेत होते. चार एकरांतील ज्वारी रानडुकरांनी खाऊन फस्त केली. विघ्ने यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, पत्नी, नातवंडं असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Web Title: Leopard killed farmer in wardha district

टॅग्स